कोगनोळीतील हालसिद्धनाथ नगर मधील मराठी शाळेच्या अध्यापिका शैलजा सावंत यांचा सत्कार…

राहुल मेस्त्री

कोगनोळी तालुका निपाणी येथील हालसिद्धनाथ नगर मधील मराठी मुला मुलींची शाळा कोगनोळी येथील अध्यापिका सौ शैलजा बाबासो सावंत यांना अविष्कार फाउंडेशन कर्नाटक राज्य यांचा सावित्रीबाई फुले गुणवंत पुरस्कार मिळाल्या बदल कोगनोळी येथील व कोल्हापूर जिल्हा शिक्षक नेत आयु.तानाजी घस्ते,सर आणि एलआयसी सेवानिवृत्त अधिकारी महादेव विटे यांनी सत्कार केला.

सत्कारमूर्ती शैलजा बाबासो सावंत या मूळच्या कागल तालुक्यातील कुरुकली येथील रहिवासी आहेत.तर सध्या निपाणी येथे वास्तव्यात आहेत. आजपर्यंतच्या 15 वर्षाच्या सेवेमध्ये पहिला अक्कोळ तालुका निपाणी येथे अध्यापिकेला सुरुवात केली व गेल्या तीन वर्षापासून कोगनोळी हालसिद्धनाथ नगर मराठी शाळेमध्ये सेवा करत आहेत. तर सदर पुरस्कार तीन जानेवारी रोजी वितरण झाला असून निपाणी येथील रोटरी क्लब येथे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांच्या हस्ते देण्यात आला.

यावेळी स्वागत व प्रास्ताविक येथील शिक्षक शरद कांबळे सर यांनी केले. याप्रसंगी पोमान्ना कोळेकर,मुख्याध्यापिका श्रीमती जे एम देवदास, ए जे चौगुले, एस आर पाटील,टी ए शिंदे मॅडम,एस एन देसाई मँडम आदी शिक्षक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here