नुसरत भरुचाच्या कंबरेवरील टॅटू राहिला अर्धवट, कारण…

न्युज डेस्क – बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा तिच्या चित्रपटांव्यतिरिक्त सोशल मीडियावरील तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळेही चर्चेत असते. नुसरतनं सोशल मीडियावर बिकिनीतील बरेच ग्लॅमरस आणि हॉट फोटो अपलोड केलेले आहेत. पण यातही तिच्या कंबरेवर असलेला एक टॅटू सर्वांचं लक्ष वेधून घेताना दिसतो. पण फार कमी लोकांना माहीत आहे की, हा टॅटू पूर्ण नाही तर अर्धवट आहे. पण असं का यामागचं कारणंही आता नुसरतनं स्पष्ट केलं आहे.

नुसरत भरुचाचा हा टॅटू मागच्या वर्षी पहिल्यांदा तेव्हा चर्चेत आला होता जेव्हा अमेझॉन फिल्मफेअर अवॉर्ड समारंभाला ती हिरव्या रंगाचा वेस्ट हाय स्लिट ड्रेस परिधान करून पोहोचली होती. यावेळी तिच्या ग्लॅमरस लुकनं तर सर्वांना घायाळ केलंच होतं पण त्यासोबतचं तिच्या कंबरेवरील टॅटूही चर्चेत आला होता.

नुसरतनं हा टॅटू २०१८ साली ‘सोनू के टीटू की स्वीटी’ या तिच्या सुपरहिट चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी जॉर्जियामध्ये काढून घेतला होता. या ठिकाणी १०-१२ दिवस या चित्रपटाचं शूटिंग होतं पण जास्त सीनमध्ये नुसरत नव्हती. त्यावेळी रिकाम्या वेळात तिनं हा टॅटू बनवून घेतला होता.

नुसरतच्या या टॅटूच्या डिझाइनमध्ये फिनिक्स पक्षी रेखाटण्यात आला आहेय ज्याच्या पंखांवर फुलं आहेत. नुसरतला हा टॅटू खूप आवडला होता. तिनं ऑनलाइन या टॅटू आर्टिस्टला शोधलं होतं आणि टॅटू बनवून घेतला होता.

एका मुलाखतीत नुसरतनं हा टॅटू अर्धवट असल्याचा खुलासा केला. नुसरत म्हणाली, हा टॅटू पूर्ण होऊ शकला नाही कारण एका तासानंतर त्या वेदना सहन करणं मला कठीण झालं होतं. हा टॅटू काढायला जवळपास ६-७ तासांचा वेळ लागला होता. मला त्यात आणखी काही जोडायचं होतं पण एवढ्या वेदना होत असताना मला ते जमलंच नसतं. त्यामुळे मी तो विचारच सोडून दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here