तामिळनाडू भाजप कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब फेकला…

फोटो -सौजन्य ANI

चेन्नईतील भाजप कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आला. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, बुधवारी रात्री एकच्या सुमारास तामिळनाडू भाजपच्या कार्यालयावर अज्ञात व्यक्तीने पेट्रोल बॉम्ब फेकल्याची माहिती मिळाली असून भाजपाने द्रमुक जबाबदार असल्याचे म्हणणे आहे.

भाजप नेते कराटे त्यागराजन यांनी सांगितले की, रात्री दीडच्या सुमारास आमच्या कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आला. 15 वर्षांपूर्वी अशीच एक घटना घडली होती ज्यात द्रमुकचा हात होता. या घटनेबद्दल आम्ही तामिळनाडू सरकारच्या (भूमिकेचा) निषेध करतो. आम्ही पोलिसांनाही कळवले आहे. अशा गोष्टींना भाजपचे कार्यकर्ते घाबरत नाहीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here