तालुका क्रिडासंकुलचे काम अंतिम टप्यात; सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कामाच्या स्थितीचा अहवाल पाठवण्यास टाळाटाळ:- तालुका क्रिडाधिकारी…

बिलोली – रत्नाकर जाधव

बिलोली येथील तालुका क्रीडासंकुलचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग व कंत्राटदारांच्या मनमानी कारभारामुळे रखडले असून सदरील क्रीडासंकुलचे कामाच्या प्रगतीपथाचा अहवाल क्रीडाधिकारी यांच्याकडे पाठवण्यास सा.बा.विभाग व कंत्राटदाराकडून टाळाटाळ केली जात असल्याची माहिती तालुका क्रीडाधिकाऱ्यांनी दिली आहे.

येथील क्रीडासंकुल सातत्याने वादाच्या भवऱ्यात राहिले आहे. सुरवाती पासून निधी प्राप्ती नंतरही अंतर्गत राजकारणामुळे संकुलाच्या बांधकाम प्रलंबित पडले होते. नगरपरिषदेकडून क्रीडासंकुलचे जागा साफ करून देण्यास न.प.ने साफ नकार दिला.

त्यामुळे शहरातील सेवानिवृत्त कर्मचारी,खेळाडू व माजी लोकप्रतिनिधींनी लोकसहभागातून क्रीडासंकुलची जागा साफ करून दिली.तत्कालीन आ.सुभाष साबणे यांनी राज्यशासनाकडून आलेला निधी जिल्हाक्रीडा कार्यालयाकडून बिलोलीच्या सार्वजनिक बाधंकाम विभागाकडे वर्ग केला.

सदरील कामाची निविदा हि स्वामी नरेंद्र कॅस्ट्रक्शन ला सुटल्या नंतर सहा महिन्यांच्या आत काम पूर्ण करण्याचे आदेश दिले.परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी व कंत्राटदारात समनव्य होत नसल्याने कार्यारंभ आदेश दिल्या नंतर तीन महिने उशिरा बांधकामास सुरु झाले.आज स्थितीत क्रीडासंकुलचे बांधकाम अंतिम टप्यात आले आहे.

या संकुलाच्या वाढीव कामासाठी क्रीडासंचनाल्याकडे प्रस्ताव पाठवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कामाच्या प्रगतीचा अहवाल आवश्यक आहे. परंतु सदरील सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित कंत्राटदाराकडून अहवाल देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप तालुका क्रीडाधिकारी श्री गुरुदीपसिंग संधू यांनी केला आसून या बाबतीत सार्वजनिक बांधकाम विभागाला तीन पत्र पाठवले आहे.

परंतु या कार्यालयाकडून क्रीडाधिकारी यांच्या पत्राला केराची टोपली दाखवली आहे.या क्रीडासंकुलच्या अद्यावत सुविधांसाठी आणखीन ५ कोटींचा निधी प्रस्तावित असून जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून अंदाजपत्रक पाठवायचा आहे.

त्यासाठी सद्यस्थिती क्रीडासंकुलच्या बांधकामाची स्थिती अहवाल आवश्यक असल्याचे श्री संधू यांनी सांगितले आहे.अहवाल देण्यास सार्वजनिक बांधकाम विभागासह कंत्राटदार ही टाळाटाळ करत असल्यामुळे ५ कोटीच्या निधीचा प्रस्ताव पाठवण्यास अडचण येत असल्याची माहिती हि क्रीडाधिकारी गुरुदीपसिंह संधू यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here