काबूलमध्ये पाकिस्तानविरोधी रॅलीमध्ये तालिबानने केला गोळीबार…पाहा व्हिडिओ

फोटो- Video snapshot

न्यूज डेस्क – इस्लामाबाद आणि आयएसआयच्या विरोधात घोषणा देत शेकडो अफगाणी, ज्यात बहुतेक महिला होत्या, पाकिस्तानविरोधी रॅलीमध्ये काबूलच्या रस्त्यावर उतरल्या. या लोकांचा विरोध तीव्र झाल्यावर तालिबान्यांनी रॅलीवर गोळीबार केला.

एएफपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, तालिबानने काबूलमध्ये पाकिस्तानविरोधी रॅली पांगवण्यासाठी हवेत गोळीबार केला.

असवाका न्यूज या स्थानिक प्रसारमाध्यमाने वृत्त दिले आहे की तालिबानने काबूलमधील राष्ट्रपती भवनाजवळ जमलेल्या आंदोलकांवर गोळीबार केला. आंदोलक काबुल सेरेना हॉटेलच्या दिशेने कूच करत होते, जेथे पाकिस्तान आयएसआयचे संचालक गेल्या आठवड्यापासून थांबले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here