२०१९ तलाठी पदभरती नियुक्तीचा मार्ग मोकळा; भूषण गायकवाड यांच्या मागणीला यश..!

अकोला – तलाठी पदभरती २०१९ घेण्यात आली होती, तलाठी पदभरतीसाठी पात्र उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी झाली असून अंतिम निवड याद्या देखील जाहीर करण्यात आल्या होत्या. कोरोनानंतरच्या काळात राज्य शासनाने ४ मे २०२० रोजी काढलेल्या आदेशानुसार नवीन पदभरती न करण्याचे आदेश देण्यात आले होते,

त्यामुळे २०१९ तलाठी पदभरती निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्त्या देण्यात अडचणी निर्माण होत होत्या,. विशेष बाब म्हणजे अनेक जिल्ह्यांनी याच भरतीमधील उमेदवारांना नियुक्ती सुद्धा दिलेली आहे. परंतु राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अद्यापही पात्र उमेदवारांना नियुक्त्या मिळालेल्या नाहीत.

या अनुषंगाने अकोला जिल्हा काँग्रेस कमिटी ग्रामीण अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाकार्याध्यक्ष श्री. भूषण गायकवाड यांनी ८ ऑगस्ट २०२० रोजी राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धवजी ठाकरे व महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांना पत्राद्वारे २०१९ तलाठी पदभरती मधील पात्र उमेदवारांना नियुक्ती होण्याची मागणी केली होती.

त्यामुळे राज्यशासनाच्या महसूल व वन विभागाने ९ सप्टेंबर २०२० रोजी तलाठी गट क संवर्गाची पदभरती करण्यास राज्यातील विभागीय आयुक्तांना आपल्या अधिनस्त असलेल्या सर्व संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयास निर्देश देण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. व २०१९ तलाठी पदभरतिची कार्यवाही विनाविलंब पूर्ण करण्याबाबत आदेशित केले आहे. त्यामुळे २०१९ तलाठी पदभरती नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here