भिडे पुलावर सेल्फी काढणे दोन तरुणांच्या जीवावर बेतले…

न्यूज डेस्क – पुण्यात दसरा सणासाठी कपडे खरेदीसाठी गेलेल्या दोन तरुणांचा सेल्फी काढण्याचा मोह जीवावर बेतला. सेल्फी काढताना तोल जाऊन दोन्ही तरुण पुण्यातील भिडे पुलावरुन मुठा नदीत पडले आणि पुरात वाहून गेले. ओम तुपधर (वय-17) आणि सौरभ कांबळे (वय- 20, दोघे रा. ताडीवाला रोड अशी पुरात वाहून गेलेल्या तरुणांची नावं आहेत.

पुण्याच्या ताडीवाला परिसरात राहणारे दोघे मित्र डेक्कनला नवरात्र, दसरा सणासाठी कपडे खरेदीसाठी आले होते. भिडे पुलावर फोटो काढण्यासाठी एक जण थांबला असता पाण्याचा प्रवाह वाढला. मित्र वाहत आसताना वाचवायाला गेलेला तरुणही गेला वाहून गेला. अग्निशमन दलाकडून दोन्ही तरुणांचा शोध सुरू आहे. शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे मुठा नदीत पाण्याचा मोठा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदी दुथडी भरून वाहत आहे. ओम हा भिडे पुलावर सेल्फी काढत होता. ओम तोल जावून पाण्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी सौरभनेही पाण्यात उडी घेतली मात्र तोही वाहून गेला. तिसऱ्या मित्राने याबाबत पोलिसांना माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here