लाॅकडाऊन मागे घ्यावा अन्यथा तिव्र आंदोलनं करु; वंचित बहुजन आघाडी चा शासनाला इशारा…

चिखली – राहुल गवई कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शासनाने लादुन दिलेले लाॅकडाऊन तात्काळ मागे घेण्यात यावे यासाठी वंचित बहूजन आघाडी चिखली तालुक्याचे वतीने माननिय मुख्यमंत्री महाराट्र राज्य यांना मा. तहसिलदार चिखली यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले.

वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार चिखली तालुक्याचे वतीने माननीय मुख्य मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना मा. तहसिलदार चिखली यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले की महाराष्ट्रातील जनतेची कोणत्याही प्रकारची व्यवस्था न करता त्यांचे उदरनिर्वाहाच्या कुठल्याच प्रकारे नियोजन न करता शासनाने लागू केलेल्या लाॅकडाऊन तात्काळ मागे घेण्यात यावे यासंदर्भात निवेदन देण्यात आले.

शासनाच्या नियोजन शून्य कार्य प्रणालीमुळे कोरोणाच्या नावावर जनतेची दिशाभूल करणे आयत्या वेळेला नको त्या प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी जनतेला बाधील करणे हे अन्यायकारक आहे अशा प्रकारचे अन्याय शासनाकडून वंचित बहुजन समाजावर होत आहेत हे अन्याय दूर करावे शासनाच्या माध्यमातून हे निर्बंध लावण्यात आलेले आहेत ते तात्काळ मागे घेण्यात यावे व,

तसेच कोरोना प्रादुर्भाव हा संपणार नाही त्याकरिता वेगवेगळ्या उपाययोजना शासनाने राबवाव्यात व लाॅकडाऊन न करता जनतेला जास्तीत जास्त सेवा कशा पुरवता येतील याचा शासनाने गांभीर्याने विचार करावा तसेच आपण घेतलेला निर्णय मागे घ्यावा गोरगरीब जनतेस व्यापारी शेतकरी शेतमजूर यांना न्याय देऊन राज्याची खालावलेली आर्थिक परिस्थिती सुरळीत करावी ही रास्त मागणी आपल्याकडे वंचित बहुजन आघाडी चिखली तालुक्याच्या वतीने करण्यात आली आहे.

तसेच सदर मागणी तात्काळ मंजूर न झाल्यास श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार शासनाच्या विरोधात लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी असे आशयाचे निवेदन वंचित बहुजन आघाडी चे तालुकाध्यक्ष संजय धुरंधर यांचे नेतृत्वात देण्यात आले.

यावेळी बाळासाहेब भिसे शहर अध्यक्ष प्रा मिलिंद मघाडे, राहुल गवई, सिद्धार्थ वानखेडे, प्रवीण खरात ,रघुनाथ गवई ,अमरपाल वाघमारे ,सुमित जाधव ,दीपक साळवे ,संजय जाधव ,राजेंद्र सुरडकर ,विनोद कळसकर ,दादाराव पडघान ,राजेश खंडारे ,विनोद बोर्डे ,जितेंद्र निकाळजे, मिलिंद लहाने ,रवी राजूरकर, प्रकाश बनकर गजानन धुरंधर महेंद्र हिवाळे वासुदेव वानखडे नागसेन वानखडे यासह सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here