आरपार दिसणारे शॉर्ट्स घालून किराणामाल घ्यायला पोहोचली ‘ही’ अभिनेत्री, फोटो पहा…

न्यूज डेस्क – अभिनेत्री नोरा फतेही सध्या आपल्या स्टाइल स्टेटमेंटकडे विशेष लक्ष देत असल्याचं पाहायला मिळत आहे. कामाच्या ठिकाणी असो किंवा एअरपोर्ट लुक, ही अभिनेत्री आपल्या फॅशनेबल अवतारानं चाहत्यांना घायाळ करते. म्हणूनच नोरा भलेही थोड्या वेळासाठी जरी घराबाहेर पडणार असेल तरी ती बराच वेळ विचार केल्यानंतरच कपड्यांची निवड करत असावी, असेच दिसत आहे.

काही दिवसांपूर्वी सुद्धा असेच काहीसे उदाहरण पाहायला मिळालं. जेव्हा नोरा किराणामाल आणण्यासाठी घराबाहेर पडली होती. पण यावेळेस तिने जे कपडे परिधान केले होते, ते इतके खास व हटके नसल्याचं पाहायला मिळालं.

मुंबईच्या एका प्रसिद्ध दुकानामध्ये नोरा फतेही सामान खरेदी करण्यासाठी पोहोचली होती. स्वयंपाकघरासाठी आवश्यक असणारे सामान विकत घेण्यासाठी कित्येक सेलिब्रिटी मंडळी याच ठिकाणी येतात. यापैकीच एक नोरा फतेही सुद्धा आहे.

नोराने यावेळेसही डोक्यापासून ते पायापर्यंत आपल्या लुकची विशेष काळजी घेतल्याचं पाहायला मिळालं. तिचा लुक एकदम स्टायलिश होता. सध्या अ‍ॅथलीजर आउटफिट्सचा ट्रेंड जोमात आहे. नोराने सुद्धा अ‍ॅथलीजर स्टाइलची निवड केली होती. यासह तिनं बॅग व हील्स मॅच करून ग्लॅमरस टच देण्याचा प्रयत्न केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here