मिरज शहरातील सलीम पठाण टोळी तडीपार…

सांगली – ज्योती मोरे

सांगली मिरज शहर पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगार सलीम पठाण पोलिस पोलिस अधिक्षक दीक्षित गेडाम यांनी सांगली सातारा कोल्हापूर या तीन जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्याचा आदेश दिला आहे.

मिरज शहरातील महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याच्या हद्दीत यातील हद्दपार सलीम गौस पठाण वय 31 वर्षे राहणार मंगळवार पेठ, गणेश उर्फ निहाल तानाजी कलगुटगी वय 31 वर्षे राहणार वडर गल्ली, प्रथमेश सुरेश ढेरे वय वीस वर्षे राहणार मंगळवार पेठ, चेतन सुरेश कलगुटगी वय 34 वर्षे राहणार वडर गल्ली,

अनिस शब्बीर शेख वय पंचवीस वर्ष राहणार ख्वाजा वस्ती या मिरजेतील टोळी विरुद्ध सन 2017 ते 2019 मध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदीचा आदेशांचे उल्लंघन करून बेकायदेशीर जमाव जमवून घातक शस्त्रांनिशी खुनाचा प्रयत्न करणे, घातक शस्त्रांनिशी दुखापत करणे,व खंडणीसाठी अपहरण करणे असे सहा गंभीर गुन्हे दाखल आहेत.

ही टोळी कायद्याला न जुमानणारी असल्यानं या टोळी विरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 अन्वये पोलीस निरीक्षक मिरज शहर यांनी पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता.त्यानुसार सदर कारवाई करण्यात आली.

सदर कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले यांच्या दर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीचे पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड, मिरज शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजु तासीलदार, सहाय्यक पोलीस फौजदार सिद्धाप्पा रूपनर, पोलीस कॉन्स्टेबल दीपक गट्टे, पोलीस हेडकॉन्स्टेबल ऋषिकेश बडणीकर, पोलीस नाईक नागेश कांबळे यांनी भाग घेतला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here