टी -२० विश्वचषक २०२१ | भारत-पाकिस्तान आमने सामने…

फोटो- Twitter

न्यूज डेस्क – भारत-पाकिस्तान पुन्हा एकदा टी -२० विश्वचषकात एकत्र येणार असल्याने दोन्ही संघांना सुपर -12 टप्प्यात एकाच गटात स्थान मिळालं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आगामी टी-२० वर्ल्डकपसाठी गटांची घोषणा केली आहे. आज शुक्रवारी ओमानमध्ये गटात कोणकोणते संघ असणार, हे निश्चित करण्यात आले.

विशेष म्हणजे, भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी एकाच गटात आहेत. दोघेही सुपर-१२च्या ग्रुप गट-२ मध्ये आहेत. २०१९च्या वनडे वर्ल्डकपमध्ये दोन्ही संघ शेवटचे आमनेसामने आले होते. यात भारताने विजय मिळवला होता.

टी-२० वर्ल्डकप १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान भारताऐवजी यूएई आणि ओमान येथे खेळला जाईल. ओमानमधील बैठकीत आयसीसीच्या अधिकाऱ्यांसह बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांनीही भाग घेतला. टी-२० वर्ल्डकपचे सामन्याचे वेळापत्रक पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे.

ओमान आणि यूएई येथे खेळल्या जाणार्‍या या स्पर्धेच्या पहिल्या फेरीत आठ पात्र संघ सहभागी होणार आहेत. यातील चार संघ सुपर १२ फेरी गाठतील. प्राथमिक फेरीतील आठ संघांमध्ये बांगलादेश, श्रीलंका, आयर्लंड, नेदरलँड्स, स्कॉटलंड, नामीबिया, ओमान आणि पापुआ न्यू गिनी यांचा समावेश आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना १४ नोव्हेंबरला होणार आहे.

टी -20 वर्ल्ड कपमध्ये सहाव्यांदा भारत आणि पाकिस्तानच्या संघ एकमेकांशी सामना करतील. यापूर्वी 2007 मध्ये झालेल्या अंतिम सामन्यासह दोन्ही संघांनी दोनदा सामना केला होता. 2012 मध्ये भारत आणि पाकिस्तानची पुन्हा सुपर -8 मध्ये सामना झाला होता. याखेरीज 2014 आणि 2016 मध्ये दोन्ही संघ गट स्तरावर आमनेसामने होते. टी -20 वर्ल्ड कपचा हा सातवा सत्र असेल. मागील दोन हंगामांमध्ये 2009 आणि 2010 मध्ये दोन्ही संघांमध्ये सामना झाला नव्हता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here