T-20 वर्ल्ड कप भारतात होणार नाही…आता ‘या’ देशात होणार…जाणून घ्या

न्यूज डेस्क – आगामी टी -२० विश्वचषक स्पर्धा भारतात होणार नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिन जय शाह म्हणाले की, आम्ही भारतात होणाऱ्या 2021 टी -20 वर्ल्ड कपला संयुक्त अरब अमिरातीमध्ये हलवित आहोत. या संदर्भात आज बीसीसीआयच्या वतीने आयसीसीला माहिती देण्यात येणार आहे. बीसीसीआयच्या सचिवाच्या माहितीनुसार युएईमध्ये होणाऱ्या टी -20 विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिल तयार करेल.

टी -20 विश्वचषक 2021चे आयोजन भारतात आयोजित करण्यात आले होते. परंतु कोरोना विषाणूच्या जागतिक साथीच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने ते संयुक्त अरब अमिरातीमध्ये हलविण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी 2020 मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये होणारा टी -20 विश्वचषक कोरोनामुळे रद्द करण्यात आला होता.

टी -२० विश्वचषक भारतकडून युएईमध्ये हस्तांतरित करण्याबाबत उपाध्यक्ष राजीव शुक्ला म्हणाले की, “वर्ल्ड कपचा प्रश्न आहे, तर आजची मुदत होती आणि बीसीसीआयला आपला निर्णय आयसीसीला सांगावा लागला. आज बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेद्वारे चर्चा केली, त्यादरम्यान आम्ही कोरोनाच्या परिस्थितीचा देखील आढावा घेतला.

राजीव शुक्ला पुढे म्हणाले, 2-3 महिन्यांनंतर काय होणार आहे हे कोणालाही ठाऊक नाही, सर्व गोष्टी डोळ्यासमोर ठेवून बीसीसीआय आयसीसीला युएईमध्ये हलविण्यास सांगितले, असा निर्णय घेण्यात आला आहे कारण हे भारतानंतर सर्वात पर्यायी जागा आहे. ते पुढे म्हणाले की आम्हाला त्याचे भारतात होस्ट करायचे होते आणि आमचे पहिले प्राधान्य भारत होते.

ते पुढे म्हणाले, टी -२० वर्ल्डचा प्रारंभ आयपीएलनंतर ताबडतोब होईल, क्वालिफायर सामने ओमानमध्ये होणार आहेत परंतु वर्ल्ड कपचे सामने दुबई, अबूधाबी आणि शारजाह या तीन ठिकाणी होतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here