प्रदूषीत राखेच्या अवैध साठवणूक प्रकरणी विराज कंपनीवर कारवाईची टांगती तलवार…

बोईसर – विनायक पवार

प्रदूषण नियंत्रण मंडळासमोर सुनवाई सुरु होणार…

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील विराज प्रोफाईल ही पोलाद कंपनी बोईसर पूर्वेकडील बेटेगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत करीत असलेल्या क्षमतेपेक्षा व अवैध रित्या प्रदूषीत राखेची लाखो टन अवैध साठवणूक प्रकरणी कंपनीवर कारवाईची टांगती तलवार लटकत असून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळासमोर कंपनीची सुनावणी घेण्यात येणार आहे.या सुनावणीत कंपनीवर काय कारवाई होते यांवर सर्व बेटेगाव व बोईसर वासियांचे लक्ष लागून राहीले आहे.

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील पोलादावर प्रक्रिया करताना तयार झालेली प्रदूषीत राख,स्लग आणि इतर घातक घनकचरा परवानगी देताना घातलेल्या अटी-शर्तींचा भंग करीत शेजारील बेटेगाव ग्रामपंचायत हद्दीत बेकायदा साठवणूक करणार्‍या विराज प्रोफाईल कंपनीला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दणका देत कारणे दाखवा नोटीस बजावून ७ दिवसांत आपली बाजू मांडण्यास सांगितले होते.

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील विराज प्रोफाईल या कारखान्याच्या तीन प्लांटमधून लोखंडावर प्रक्रिया करताना तयार होणारी प्रदूषीत राख आणि स्लग पावडर बोईसरच्या पूर्व भागातील बेटेगाव ग्रामपंचायत हद्दीतील नवापाडा या आदीवासी पाडयाजवळील जागेत जमा केली जाते.

या ठिकाणी ही राख आणि स्लग पावडर साठवणूक करण्यासाठी व विल्हेवाट लावण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिनांक ३१ मे २०२० रोजी दिलेल्या परवानगीचे सर्रास उल्लंघन करीत विराज प्रोफाईल कंपनी क्षमतेपेक्षा अधिक प्रदूषीत राख व स्लग पावडरची बेकायदा साठवणूक करीत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थ करीत आहेत.

त्याच बरोबर या ठिकाणी परवानगी नसताना देखील प्लास्टीक कचरा रबर आणि ऑईलचा कचरा यांची देखील साठवणूक होत असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी यांनी केलेल्या तपासणीत उघड झाले होते.

प्रदूषीत राखेसोबतच घातक घनकचर्‍याच्या बेकायदा साठवणूकीमुळे या ठिकाणी सातत्याने आग लागणाच्या घटना घडत असून त्यातून तयार होणार्‍या घातक धूरामुळे बाजूच्या आदीवासी पाड्यातील लहान मुले आणि नागरीकांना अनेक प्रकारच्या शारीरीक व्याधींनी ग्रासले असून शेतजमीन आणि पिण्याचे पाण्याचे स्त्रोत देखील प्रदूषीत बनले आहेत.

विराज प्रोफाईल कंपनीमुळे होणार्‍या या घातक प्रदूषणाविरोधात स्थानिक ग्रामस्थ सातत्याने तक्रारी करीत असून प्रदूषीत राख व घातक घनकचर्‍याची बेकायदा साठवणूक तात्काळ बंद करून कंपनी वर्ती कारवाई करण्याची मागणी स्थानिक आदिवासी समाज बांधव करत आहेत.

विराज कंपनीने अवैध रित्या टाकलेले स्लग,राखे,प्लास्टिक कचरा,ऑइल या घनकचऱ्या बाबत महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या कार्यालयांमध्ये सुनवाई सुरू होणार असून आमची महाराष्ट्र प्रदूषण मंडळ चेअरमन व सदस्य सचिव साहेबाना विनंती आहे कंपनी वर्ती कडक कारवाई करावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here