Home Marathi News Today

स्वामी विवेकानंद जयंती विशेष…स्वामींच्या जीवनात घडलेल्या एका विशेष प्रसंगाबद्दल…जाणून घ्या

गुंजन मेश्राम

स्वामी यांचा जन्म १२ जानेवारी १८६३ रोजी कलकत्ता येथे विश्वनाथ दत्त आणि आई भुवनेश्वरी देवी यांचा घरी झाला. विवेकानंद म्हणून त्यांची ओळख पटण्यापूर्वी हे सर्व त्याला नरेंद्रनाथ दत्तच्या नावाने ओळखत असत…..राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यातील खेत्री येथील महाराजा अजितसिंग यांनी त्याचे नाव विवेकानंद ठेवले. त्यांना अमेरिकेत पाठवण्याचे श्रेय महाराजा अजितसिंग यांनाही जाते….

शिकागोमधील त्यांच्या भाषणामुळे बनलेली त्याची ओळख अमर झाली…. खेत्रीच्या महाराजांनी त्यांना आपला गुरु मानले….शिकागो येथे जागतिक धर्म परिषदेत जाण्याचा संपूर्ण खर्चही महाराज अजितसिंग यांनी खर्च केला….शिकागो येथे भाषणानंतर अमेरिकन माध्यमांनी त्याला साइक्‍लोन हिंदू असे नाव दिले….वयाच्या 25 व्या वर्षी स्वामी विवेकानंद यांनी भगवा परिधान करून संपूर्ण भारत पायी प्रवास केला. 31 मे 1893 रोजी त्यांनी मुंबई येथून सुरुवात केली. त्यांचा वाढदिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो….

स्वामी विवेकानंद परदेश दौर्‍यावर असतांना आणि वेगवेगळ्या ठिकाणी व्याख्याने देताना महिला फार प्रभावित व्हायच्या. असे एक भाषण ऐकून प्रभावित झालेली एक स्त्री त्याच्याकडे आली आणि म्हणाली की मला आपल्याशी लग्न करायचे आहे, जेणेकरून मलाही आपल्यासारखा प्रतिभावान मुलगा मिळेल…. या महिलेचे म्हणणे ऐकल्यावर स्वामीने शांतपणे यावर बोलताना म्हणाले मी एक संन्यासी आहे. आणि यामुळे मला लग्न करता येणार म्हणून, आपण मला पुत्र म्हणून स्वीकारू शकतात….

असे केल्याने दोघांचेही मन मोडू शकणार नाही आणि आपल्याला एक मुलगा मिळेल आणि मला आई….हे ऐकून त्या महिलेच्या डोळ्यांतून अश्रू पडले आणि ती स्वामीच्या पाया पडली आणि म्हणाली की आपण धन्य आहात. तुम्ही देवाचे स्वरुप आहात जो कोणत्याही वाईट वेळीसुद्धा विचलित होऊ शकत नाही….असे स्वामीच्या जीवनात अनेक प्रसंग आलेत तेवढ्या धर्याने स्वामी सामना करीत असत…स्वामी विवेकानंदांनी वयाच्या 39 व्या वर्षी जग सोडले. बेलूरमधील गंगेच्या काठावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!