मूर्तिजापूर -येथील कांता फाऊंडेशन व्दारा संचालित जिगीषा मंचव्दारे राजमाता जिजाऊसाहेब व स्वामी विवेकानंद यांची जयंती अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली.दोन्ही प्रतिमांच्या पुजन व हारार्पणानंतर मीना जवादे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यानंतर उपस्थित महिलांनी जिजाऊसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या कार्यावर प्रकाश टाकून,महिलांनी सदगुणांच्या संस्काराची सुरुवात परिवारापासूनच करावी असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे मा जिजाऊंसारखा वेश परिधान करुन सौ. उज्वला सवाईकर यांनी जिजाऊसाहेब यांच्या जीवनावर आधारीत एक गीत सादर केले.
यानंतर याच कार्यक्रमामध्ये जिगीषा महिला मंचाची कार्यकारीणी जाहीर करण्यात आली.

यामध्ये अध्यक्ष निलिमा आष्टीकर,उपाध्यक्ष अंजली भेलोंडे,सचिव उज्वला सवाईकर,सहसचिव सुनिता कांबे,कोषाध्यक्ष मंजुषा ताले,प्रसिध्दीप्रमुख वर्षा कावरे,कार्याध्यक्ष योगीता वानखडे,संघटक दीपाली देशमुख,मार्गदर्शक तृप्ती उंबरकर तर सदस्या म्हणून वैशाली खडतडकर,संगीता सवाईकर,संजीवनी कुबेटकर,शितल अवघड,अर्चना देशमुख,शितल दुरतकर,चित्रा देशमुख,साधना नवघरे,अनिता पाटील,भाग्यश्री मुळे,आशा ठाकरे हयांची निवड करण्यात आली.
सदर संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन निलिमा आष्टीकर व आभार प्रदर्शन तृप्ती उंबरकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी किशोर आष्टीकर,वेदांत आष्टीकर,कल्याणी आष्टीकर,रवींद्र जवादे,शब्दश्री जवादे,देवयानी कावरे हयांनी परिश्रम घेतले असे प्रसिध्दीप्रमुख वर्षा कावरे यांनी कळविले आहे.