स्वामी नेचर क्लब वाडांबा तर्फे वृक्षारोपण व संवर्धन कार्यक्रम संपन्न…

शिक्षक, विद्यार्थी व गावकऱ्यांचा सहभाग…

देवलापार – पुरुषोत्तम डडमल

वनमहोत्सवाच्या अनुषंगाने स्वामी विवेकानंद विद्यालय देवलापार व गट ग्रामपंचायत वडांबा यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच वडांबा गावामध्ये विविध स्थानांवर वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेण्यात आले. वडांबा गावात राहणार्‍या व स्वामी विवेकानंद विद्यालयात शिकणार्‍या सर्व विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जाणीवजागृती व आत्मीयता निर्माण व्हावी या हेतूने विद्यालयातील शिक्षक उल्हास इटनकर यांनी गावातील सर्व विद्यार्थ्यांच्या घरी जावून वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन योजना समजावून सांगितली.विद्यार्थांना ही योजना पटली व प्रत्यक्ष अमलात आणण्यासाठी विद्यार्थ्यांची गट रचना करण्यात आली.

त्यानुसार प्रत्येक गटाला एक झाड लावणे व त्याचं संवर्धन करणे असे ठरविण्यात आले.त्यानंतर ग्रामपंचायत वडांबा येथील सरपंच व ग्रा.पं. सदस्य यांना ही भेटून सदर योजनेविषयी माहिती देण्यात आली.त्यांनीही लगेच होकार दर्शविला त्यानुसार कार्यक्रमाची रचना ठरविण्यात आली.वृक्षारोपण कार्यक्रमाच्या दिवशी आपआपल्या नियोजित ठिकाणी सर्व विद्यार्थी व गावकरी मंडळी उपस्थित झाले.

सकाळी ८.३० ते १०.३० या दोन तासाच्या कालावधीत सातही ठिकाणचे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले.यावेळी सरपंच सौ.विणा गजानन ढोरे,पोलीस पाटील प्रविण तुपट, कारवाही प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सहायक प्रदीप सिरसकर,ग्राम पंचायत सदस्य सौ.रंजना पिल्लारे, सौ.देवशीला वाडीवे,प्रविण गेडाम, स्वामी विवेकानंद सेवा शिक्षण समितीचे सदस्य गंगाधर राऊत, कैलास राऊत, प्राचार्य जगन्नाथ गराट, पर्यवेक्षक जयंतराव देशपांडे,दीपचरण बाविसताले,दुनेदार, राठोड,दिनेशकुमार दुबे, परीश पल्लेवार,प्रकाश धोटे, कु.रेणूका बल्हारे, कु.प्राची ढोरे,कु. मोनिका ढोरे,कु. दिप्ती राऊत,निखिल राऊत, अमित बल्हारे,अमन बल्हारे तसेच स्वामी विवेकानंद विद्यालय, देवलापारचे विद्यार्थी व गावकरी मंडळी मोठया संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here