कुमारी सिरिषा विजय ठाकरे हिचे सुयश…

रामटेक – राजु कापसे

डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला येथे एम. एस. सी.(कृषि) वनस्पती रोग शास्त्र विभागाची विद्यार्थिनी कुमारी सिरिशा विजय ठाकरे नागपूर हिने दिनांक ३१ ऑक्टोबर 2020 रोजी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे द्वारा आयोजित पी.एच.डी (कृषि) सीईटी 2020 परीक्षेमध्ये महाराष्ट्र मधून ७५.५ टक्के गुण प्राप्त करून द्वितीय येण्याचा बहुमान प्राप्त केलेला आहे.

कुमारी ठाकरे हिला अभ्यासाव्यतिरिक्त समाजसेवा कला व संगीतामध्ये विशेष आवड आहे. विशेष म्हणजे कुमारी सिरीशा ठाकरे हिने बीएससी (कृषि) पर्यंतचे आपले शिक्षण डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्नित श्री संत शंकर महाराज कृषी महाविद्यालय पिंपळखुटा तालुका धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती येथून सन २०१८ मध्ये ८६.९ टक्के गुण घेऊन पूर्ण केलेले आहे.

कुमारी सिरीशा ठाकरे हिचे तिच्या या अभूतपूर्व यशाबद्दल तिचे आई-वडील श्री संत शंकर महाराज कृषी महाविद्यालय पिंपळखुटा चे अध्यक्ष श्री प्रशांत जी सेलोकर, सर्व व्यवस्थापन समिती सभासद, प्राचार्य डॉ शरद नायक ,रासेयो कार्यक्रम अधिकारी, प्रा दीपक बोंद्रे ,प्लेसमेंट सेलचे प्रा पवन चिमोटे, मनीषा लांडे,प्रा. वृषाली देशमुख, पद्माकर नागपुरे व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here