राष्ट्रीय पेयजल योजनेत भ्रष्टाचार झाल्याची शंका..! माहितीच्या अधिकारात माहिती देण्यास विलंब…

राज्य माहिती आयोगाने लावली संबंधित अधिकाऱ्यास प्रत्येकी २३ हजाराची शास्ती (दंड)…

बुलढाणा – अभीमान शिरसाट

देऊळगाव मही येथील राष्ट्रीय पेयजल (पाणीपुरवठा) योजनेत लाखो रुपयांची अफरातफर झाल्याची शंका आल्याने येथील सामाजिक कार्यकर्ते रामदास पाटीलबा शिंगणे यांनी माहिती अधिकारात माहिती मागितली परंतु सदर अधिकाऱ्यांनी माहिती देण्यास विलंब करून टाळाटाळ केली असता त्यांना प्रत्येकी 25 हजार रुपयांचा दंड ( शास्ती ) राज्य माहिती आयोग ,अमरावती खंडपीठ यांनी ठोठावला आहे.

याबाबत सविस्तर असे की, देऊळगाव मही येथील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची गैरसोय टाळावी या हेतूने राष्ट्रीय पेयजल योजना राबविण्यात आली परंतु सदर योजनेच्या अंदाजपत्रकाची सविस्तर काम पूर्ण करण्याची अंतिम तारीख ठेकेदाराचे नाव व पूर्ण पत्ता,पाणी समिती अध्यक्ष व सदस्य व पदाधिकाऱ्यांची यादी,

योजना पूर्ण करण्यासाठी शासनाकडून मंजूर झालेली रक्कम, ठेकेदाराला सदर योजनेचे किती रुपयात काम दिले ती रक्कम, शासनाकडून आजपर्यंत प्राप्त रक्कम ,तारखेनुसार खर्च केलेली रक्कम ,चेक नंबर, बँकेचे नाव, तारखेनुसार सदर कामाचे सादर करण्यात आलेले बिल,

कामाची नोंदवही इत्यादी कामाची माहिती मिळण्यासाठी शिंगणे यांनी माहिती अधिकारी तथा सचिव ग्रामपंचायत कार्यालय देऊळगाव मही यांच्याकडे माहितीच्या अधिकारात अर्ज सादर केला परंतु त्यांनी माहिती देण्यास विलंब करून टाळाटाळ केली,

असता राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठ यांनी माहितीचा अधिकारा नुसार जनमाहिती अधिकारी एस .के . काळुसे ,एस .एम .बोंबले, व्ही. एस .रिंढे,यांनी 30 दिवसाच्या विहित मुदतीत उपलब्ध व देयक ठरत असलेल्या माहितीचे अपीलार्थीस प्रधान केले नाही म्हणून त्यांना कलम 20 (1) नुसार प्रत्येकी पंचवीस हजार रुपयाची शास्ती( दंड )केला आहे.

माहिती आयोगाने प्रथम अपिलीय अधिकारी तथा गटविकास अधिकारी पंचायत समिती देऊळगाव राजा यांना समज देऊन प्रथम अपीलामध्ये माहिती पुरवण्याचे आदेश दिले तसेच आयोगाने कलम 19(10)नुसार पारित केलेले आदेश कलम 19(7) नुसार अंतिम आहेत.

यावर सबब देत जर अंमलबजावणी अधिकाऱ्याने पारित आदेशाचे निर्धारित वेळेत अनुपालन करण्यास टाळाटाळ केली तर ते भारतीय दंड संहिता 1860 कलम 166 नुसार फौजदारी कारवाईस पात्र राहतात हे संबंधिताचे निदर्शनास सुद्धा आणून दिले.या सर्व प्रकरणावर लक्ष केंद्रित केले असता सदर पेयजल योजनेत खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे नाकारता येत नाही हे मात्र विशेष…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here