अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील RFO दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्या नंतर त्यांनी लिहलेल्या आत्महत्या पूर्वी चिठ्ठीत वरिष्ठ अधिकाऱ्यांना कंटाळून आत्महत्या केल्याचे नमूद केले होते तर वरिष्ठ अधिकारी मुख्य वनरक्षक श्रीनिवास रेड्डी यांनी दिपालीच्या तक्रारीकडे कडे दुर्लक्ष केले असल्याने तिने आत्महत्या केल्याचा आरोप दिपालीच्या पत्रात नमूद होता.
आज अमरावती येथील मुख्य वनरक्षक व मेळघाट व्याघ्र प्रकल्पचे प्रमुख श्रीनिवास रेड्डी यांच्या निलंबनासाठी कार्यालयात भाजपने आंदोलन करत CCF प्रवीण चव्हाण व DFO मनोज खैरकार यांना घेराव घातला आहे,व कार्यालयात आंदोलन करत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे तर श्रीनिवास रेड्डी यांच निलंबन करण्याची मागणी आंदोलन कर्त्या भाजपने केली आहे.
त्याच बरोबर अमरावतीच्या पालकमंत्री यांनी यशोमती ठाकूर मुख्यमंत्र्यांना आज भेटल्या आणि त्यांनी पत्र दिलं होतं. तर त्यांच्याच आदेशानी रेड्डीच्या निलंबनाचे आदेश निघाले आहेत. राज्याच वनखातं पद सध्या मुख्यमंत्र्यांकडे असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावर आपला निर्णय घेत आदेश जारी केला…
श्रीमती दिपाली चव्हाण, वन परिक्षेत्र अधिकारी हरीसाल, ता धारणी जि . अमरावती यांची तक्रार घेण्यासाठी फोरम उपलब्ध झाला असता श्री. रेड्डी , यांनी याप्रकारची कोणतेही कार्यवाही केल्याचे दिसून येत नाही . श्री . रेड्डी यांनी पर्यवेक्षक अधिकारी म्हणून माझ्या पत्राची व जिल्हाधिकारी यांच्या पत्राची दखल घेतली असती तर श्रीमती चव्हाण यांच्यावर हीवेळ आली नसती . तसेच श्री . रेड्डी यांच्या नावाचा उल्लेखसुध्दा सदर प्रकरणी येत आहे . श्री . विनोद शिवकुमार , उपवन संरक्षक यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे . परंतु श्री . रेड्डी यांच्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही . त्यामुळे श्री . रेड्डी , अप्पर प्रधान , मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक , मेळघाट व्याघ्रप्रकल्प यांच्यावर गुन्हा दाखल करुन निलंबित करण्यात यावे, ही विनंती . असे पत्र मुख्यमंत्री यांना देण्यात आले.