कोलकाता येथील या दुकानातील चहाची किंमत ऐकताच वाटेल नवल…

चहा अशी एक गोष्ट आहे जी प्रत्येकाला पिण्यास आवडते. बहुतेक लोकांना चहा खूप आवडतो. पण,तुम्हाला एका कप चहासाठी एक हजार रुपये खर्च करायचा आहे का? कोणत्याही सामान्य माणसाला कधीच हजार रुपयाचा चहाचा एक कप परवडणार नाही.

पण,कोलकाता येथिल एका चहाच्या दुकानात चहाचा एक कप एक हजार रुपयाला मिळतो.हे ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल..! कोलकाताच्या मुकुंदपूर येथील निर्जश चहा स्टॉलमध्ये एक कप चहाची किमंत हि एक हजार रुपये इतकी असून पार्थ प्रतिमा गांगुली ह्या स्टॉलचे मालक आणि संस्थापक आहेत.

मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी चहा व्यवसायाबद्दल सांगितले कि जे 6 जानेवारी 2014 रोजी सुरू झाले. काही वर्षांपूर्वीपर्यंत ते एका खासगी कंपनीत काम करीत होते,तथापि, नंतर त्यांनी आपली नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला.आणि त्याचबरोबर पुढे जाण्याचा विचार त्यांनी केला.अन निरज चहा स्टॉल २०१४ मध्ये लाँच करण्यात आले.इथे ग्रीन टी, ब्लॅक टी, ओलॉन्ग टी, लॅव्हेंडर टी, मकाबरे अशा अनेक प्रकारच्या स्वादयुक्त चहा दिल्या जातात. चहाचे 100 पेक्षा जास्त प्रकार आहेत, त्यातील 60-75 दार्जिलिंगचे आहेत आणि बाकीचे जगभरातील आहेत.

चहाच्या इतर प्रकारांमध्ये सिल्व्हर सुई व्हाइट टी, लव्हेंडर टी, हिबिस्कस टी, वाईन टी, तुळस जिंजर टी, ब्लू टिश्यू टी, तीस्ता व्हॅली टी, कॉर्नब्रेड टी, रुबीज टी आणि ओके टी सारख्या अनेक स्वादांचा समावेश आहे.पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील हा चहाचा एक अतिशय लोकप्रिय स्टॉल आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here