महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे कोरोना काळात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल सुरेश पाटील यांचा सन्मान देवदुतांचा या कार्यक्रमात सन्मान…

सांगली – ज्योती मोरे

सांगली गेल्या दिड वर्षापासून कोरोना साथीने थैमान घातले असताना, सामाजिक बांधिलकीतून केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल श्री. भगवान महावीर कोवीड हॉस्पिटलचे मुख्य समन्वयक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील यांचा सन्मान महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या शुभहस्ते ‘सन्मान देवदुतांचा’ या शानदार सोहळ्यात करण्यात आला.

याप्रसंगी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सांगलीचे संस्थानिक विजयसिंह पटवर्धन, विजय बाविस्कर, विवेक गिरधारी, डॉ. पी. एन. कदम आदी मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे किरण जोशी मा. श्री. रा व त्यांचे सहकारी यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

या राज्यस्तरीय सोहळ्यात कोरोना कालावधीत विविध क्षेत्रातून आपल्या परीने उत्कृष्ट कार्य केलेल्या राज्यातील कोरोना योद्ध्यांचा गौरव करण्यात आला. सुरेश पाटील यांनी कोरोनाच्या सुरवातीच्या कालावधीमध्ये समस्त जैन समाजातील दानशूर व्यक्ति व संघटनांच्या वतीने अवघ्या ८ दिवसात ७५ लाख रुपयांची वैद्यकीय सुविधेसह मदत घेवुन १९ व्हेंटीलेटर व हायफ्लोनेजल बायपॅप मिळून एकुण २२ आयसीयु व ऑक्सीजनयुक्त ४० बेड्सचे ‘श्री भगवान महावीर ‘हॉस्पिटल’ ची उभारणी केली.

यामध्ये गरीब रुग्णांना विविध सवलती, रुग्णांना मोफत भोजन सुविधा, प्रत्येक रुग्णाला ५ हजारांची मोफत औषधे वितरित करण्यात आली. २२५ हुन अधिक रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली. त्याचबरोबर भारतीय जैन संघटनेचे शांतिलाल मुथा यांच्या सहकार्याने सांगलीमध्ये कोरोना कमांडो प्रशिक्षण, डॉक्टर आपल्या दारी, रक्त संकलन, निराश्रीतांना भोजन, मिशन कोविड कनेक्ट, दंडा सोबत मोफत मास्क, कोरोना योद्धांचा कृतज्ञता सन्मान सोहळा यासारखे विविध उपक्रम तळमळीने राबविले.

कोरोनाच्या दुस-या लाटेची तीव्रता लक्षात घेवून अवघ्या ५ दिवसात सांगलीतील लठ्ठे एजुकेशन सोसायटीच्या सहकार्याने श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील ट्रस्ट संचलित श्री. भगवान महावीर कोवीड हॉस्पिटल ‘कस्तुरबाई लेडिज हाँस्टेल येथे स्थापन करुन कोरोणा रुग्णांची सेवा केल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला असून, समाजातील सर्व स्तरातून श्री. भगवान महावीर कोवीड हॉस्पिटलच्या सर्व टीमचे अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here