नरखेड कृषी उत्पन्न बाजार समिती; सभापतिपदी सुरेश आरघोडे व उपसभापती पदी चंद्रशेखर मदनकर…

नरखेड – अतुल दंढारे

नरखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात आज दि ३१ ला पार पडलेल्या निवडणूक प्रकियेत सभापतिपदीसुरेश आरघोडे सभापती तर चंद्रशेखर मदनकर हे उपसभापती पदी १८ विरुद्ध ० मतांनी विजयी झाले. सभापती पदाकरिता महाविकास आघाडी कडून सुरेश आरघोडे उपसभापती पदाकरिता चंद्रशेखर मदनकर तर डॉ आशिष देशमुख गटाकडून सभापती बबनराव लोहे उपसभापती पदाकरिता वनिता वंजारी यांनी उमेदवारी दाखल केला होता.

उमपची शिष्टाई नामनिर्देशन मागे घेण्याची वेळ टळल्यानंतर समीर उमप यांनी शिष्टाई करून बबन लोहे यांचे ना. सुनील केदार यांच्याशी बोलणे करून दिल्यानंतर बबन लोहे व वनिता वंजारी यांनी नामनिर्देशन मागे घेण्याचे जाहीर केले परंतु वेळ निघून गेल्यामुळे मतदान झाले. सुरेश आरघोडे व चंद्रशेखर मदनकर यांना १८ पैकी १८ मते मिळाली.

तालुक्याचा राजकीय आखाडा ठरलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती च्या निवडणुकीत राज्याच्या पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री सुनील केदार विरुद्ध माजी आमदार डॉ.आशिष देशमुख लढत रंगली होता. त्यात केदार यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीने १० जागांवर विजय मिळावीत कब्जा केला होता. काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन विजय प्राप्त झाला. परंतु सभापती कोण यावरून मोठे खलबते झालीत.

विरोधी गटाने महाविकास आघाडीतील काहींना सभापती व उपसभापती पदाचे गाजर दाखवून दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांचा डाव अयशस्वी झाल्याचे आजच्या घडामोदींवरून दिसते.सुनील केदार यांनी सभापतीपदाचा अनुभव असणारे सुरेश आरघोडे यांचे नाव सभापती पदाकरिता सुचविले होते. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस मधील एका गटाने त्यांना विरोध दाखविला.

त्यातच सुरेश आरघोडे यांचे विरोधक असलेले माजी सभापती बबनराव लोहे या संधीचा फायदा घेण्याकरिता राष्ट्रवादीतील एका गटाकडे सभापती व उपसभापती पदाचा प्रस्ताव देऊन बिनशर्त पाठिंबा देण्याची तैयारी दर्शविली होती. त्यामुळे निवडणूक पूर्वी महाविकास आघाडीच्या सदस्यांना अज्ञातस्थळी हलविण्यात आले होते. ऐन वेळेवर घडलेल्या घडामोडी मुळे अनपेक्षित रित्या सुरेश आरघोडे व चंद्रशेखर मदनकर हे विजयी झाले.

विजयोत्सवात बंडुपंत उमरकर, राजेंद्र हरणे, नरेश अरसडे, संजय दळवी, नंदलाल मोवाडे, अजय बालपांडे, सतीश रेवतकर, वसंत चांडक ,सुदर्शन नवघरे , मनीष फुके, वैभव दळवी ,सुभाष पाटील, संजय बडोदेकर, नीलिमा रेवतकर, दीप्ती मूलताईकर,

विजय गुंजाळ यांच्यासह काँग्रेस , शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस चे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सामील झाले होते.कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विकासाकरिता व शेतकऱ्यांच्या हिताकरिता महाविकास आघाडीला पाठिंबा दिला . तसेच यानंतर ही विकासाकरिता मदत करेल.बबनराव लोहेमाजी सभापती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here