अंगणवाडी सेविकांसह सुपरवायजरला पडला राजमाता जिजाऊंच्या जयंतीचा विसर…

जि.प. सदस्य डोंगरेंच्या आकस्मिक भेटीत प्रकार उघड…मनसर परीसरातील अंगणवाड्यांमधील प्रकार…राजमाता जिजाऊ च्या नावाने चालते पोषण आहार मिशन

रामटेक -: (ता.प्र.)
बालके कुपोषित राहु नये यासाठी शाशन आपल्या स्तरावर विविध उपाययोजना तथा मिशन राबवित असते. या उपाययोजनांमुळे कुपोषणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात खालावलेले आहे. यातीलच एक म्हणजे राजमाता जिजाऊ पोषण आहार मिशन हे राबविण्यात येत असुन याद्वारे अंगणवाडी च्या माध्यमातुन पोषण आहार बालकांना पुरविण्यात येतो. तेव्हा यामुळे कुपोषणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात खालावलेले आहे. असे असले तरी मात्र ज्या थोर महिलेच्या नावावर अंगणवाडीमध्ये हे मिशन चालविण्यात येते त्याच अंगणवाडीच्या सेविकेसह त्यांच्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या सुपरवायजर ला त्या थोर महीलेच्या जयंतीचा विसर पडल्याचे दृष्य मनसर परीसरात दिसुन आलेला आहे.

दरम्यान सदर प्रकार चक्क मनसर – शितलवाडी सर्कलचे जिल्हा परीषद सदस्य सतीश डोंगरे यांच्या अंगणवाडीला आकस्मिक भेटीमुळे उघड आल्याने सर्वत्र खळबळ उडालेली आहे. जि.प. सदस्य डोंगरे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी काल दि. १२ जानेवारीला राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीदिनी मनसर परीसरातील एका अंगणवाडीला दुपारी १२.३० वाजता दरम्यान भेट दिली. आज राजमाता जिजाऊ यांची जयंती आहे तेव्हा अंगणवाडीमध्ये जयंती सोहळा साजरा करण्यात येत असेल असे त्यांचे यावेळी भाकीत होते. मात्र डोंगरे यांचे हे भाकीत अंगणवाडी ला दिलेल्या आकस्मिक भेटी दरम्यान पार धुळीस मिळाले.

भेटीदरम्यान येथील अंगणवाडी सेविका ह्या दुसर्‍याच म्हणजे लिखाणाच्या कामात व्यस्त दिसुन आल्या. जयंती साजरी करण्यासाठीचे साहीत्य म्हणजेच राजमाता जिजाऊ यांची प्रतिमा ( फोटो ), हळद, कुंकु, फुल आदी. वगैरे काहीच दिसुन आले नाही. एकुणच जयंती साजरी करण्याचे तिळमात्रही नियोजन दिसुन आले नाही. दरम्यान हे सर्व पाहुन डोंगरे हे उपस्थीत अंगणवाडी सेविकेसह कर्मचार्‍यांवर यावेळी चांगलेच कडाडले. तेव्हा उपस्थीत अंगणवाडी सेवीकेसह कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली व त्यांनी लगबगीने ग्रा.पं. कार्यालयातुन राजमाता जिजाऊ यांची फोटो आणणे तथा इतर सामुग्री जमविणे या सर्व क्रिया पार पाडुन जयंती साजरी करण्याचे संपुर्ण नियोजन करून राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी केली. तेव्हा एकाच अंगणवाडीत असा प्रकार आहे तर मनसर परीसरातील इतर अंगणवाड्यांमध्ये कशी काय परीस्थीती असणार असा विचार यावेळी डोंगरे यांच्या डोक्यात आला.

डोंगरेंनी केली सि.डी.पी.ओं. ची काणउघाडणी
मनसर परीसरात जवळपास २७ अंगणवाड्या असुन यापैकी एकाच अंगणवाडीमध्ये असा प्रकार आहे तर इतर अंगणवाडीमध्ये कशी काय परीस्थीती असेल या विचारावरून जि.प. सदस्य सतीश डोंगरे हे चांगलेच संतापले व त्यांनी लगेच रामटेक येथे कार्यालय असलेल्या बाल विकास प्रकल्प अधिकारी मेंढे ( महिला ) यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करून त्यांची चांगलीच काण उघाडणी केली तथा संबंधीतांवर कारवाई करण्याचे आदेश दिले.

मी सुचना केलेल्या होत्या – सि.डी.पी.ओ. मेंढे
याबाबद विचारणा करण्यासाठी दि. १३ जाने. ला रामटेक येथील बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय गाठले असता बाल विकास प्रकल्प अधिकारी मेंढे मॅडम ह्या कालपासुन आलेल्या नाहीत असे कळले. दरम्यान त्यांचेशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता व विचारणा केली असता ” मी काल व आज दोन्ही दिवस नागपुर येथे कार्यालयीन कामासाठी आले आहे असे सांगुन मी सर्व सुपरवायजर तथा अंगणवाडी सेविकांना थोर पुरुषांच्या जयंती साजरी करण्याचे सांगितले होते मात्र जि.प. सदस्यांच्या आकस्मिक भेटीदरम्यान जो ही प्रकार उघडकिस आला त्यावर मी संबंधीतांना नोटीस देवुन उत्तर मागणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here