कर्नाटकात आज पासून संडे लॉक डाऊन…

राहुल मेस्त्री

कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशासह राज्यात अडीच महिन्यापेक्षा अधिक काळ लाँक डाऊन जाहीर केला होता .त्यानंतर त्यामध्ये काही शिथिलता आणून लॉकडाऊन कमी करण्यात आला. मात्र राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याकारणाने कर्नाटकात सरकारने दिनांक ५ जुलैपासून प्रत्येक रविवारी कडक लॉकडाऊन ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

यामध्ये शनिवारी रात्री आठ पासून ते सोमवारी पहाटे पाच पर्यंत असे प्रत्येक आठवड्यात संचार बंदी असणार आहे. त्याच बरोबर दररोज रात्री आठ ते पहाटे पाच पर्यंत देखील संचारबंदी असणार आहे या काळात अत्यावश्यक सेवा वगळून सर्व व्यवहार बंद असणार आहेत. तर सरकारी कर्मचाऱ्यांचाही कामकाजाचा पाच दिवसाचा आठवडा असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here