दिपाली चव्हाण सारखी आत्महत्या प्रकरण वनविभागात पुनच्छ होउ देणार नाही – अजय पाटील…

“वनरक्षक, वनपाल संघटनेच्या आम सभेत ईशारा “

नागपूर – शरद नागदेवे

आज दिनांक 25/07/2021 रोजी महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटना नागपूर च्या नागपूर वनवृत्ताची आमसभा बाबुराव धनवटे सभागृह येथे संपन्न झाली व वृत्त अध्यक्ष म्हणून श्री. सतिश गडलींगे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. आमसभेच्या अध्यक्ष स्थानी  संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष श्री. अजय पाटील हे होते. तसेच प्रमुख अतिथी म्हणून संघटनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष श्री. माधव मानमोडे,

श्री. कांतेश्वरराव बोलके रेंजर्स असोसिशन चे अध्यक्ष, श्री. निलेश गावंडे रेंजर्स असोसिशनचे सरचिटणीस, श्री. मनोज मोहिते रेंजर्स असोसिशनचे सचिव, श्री. मडावी , श्री. संजय परेकर उपस्थित होते. त्याच प्रमाणे श्री. प्रमोद वाडे वनक्षेत्रपाल व श्री. भार्गवे वनक्षेत्रपाल यांची प्रमुख उपस्थिती होती.

सर्वप्रथम आमसभेत संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष श्री. अजय पाटील यांनी संघटनेला दिलेल्या योगदानाबद्दल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व सर्व उपस्थितांनी शाल श्रीफळ देऊन व स्मृतीचिन्ह देऊन त्यांचा सत्कार केला. या प्रसंगी श्री. अजय पाटील यांनी मेळघाट येथील हरिसाल येथे स्वर्ग वासी वनपरिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हाण यांनी वरिष्ठ अधिकारी यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली व पुनश्च अशी घटना घडणार नाही अथवा घडू देणार नाही याची संघटना दखल घेईल असे उपस्थितांना सांगितले. तसेच वेळोवेळी येणारे वनरक्षक, वनपाल यांचे प्रश्न  सोडवण्यासाठी संघटना कटिबध्द आहे, असे सुद्धा सांगितले.

श्री. सतिश गडलिंगे यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना सर्व उपस्थितांचे आभार मानून संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष श्री. अजय पाटील यांच्या खांद्याला खांदा लाऊन काम करण्यात येईल व तसेच कोणाही वनरक्षक – वनपाल यांच्यावर अन्याय होणार नाही, दुर्गम व अति दुर्गम क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याना न्याय देण्यात येईल जसे की त्यांचे नियमित पगार असो,

प्रवास भत्ता बिल असो, क्वार्टर चा प्रश्न असो, विशेषतः स्त्री कर्मचाऱ्यांवर होणारे अन्याय व त्यांच्या समस्या असो,या संबंधांमध्ये सुद्धा आपल्या भाषणातून ग्वाही दिली.  त्याचप्रमाणे वृत कार्याध्यक्ष म्हणून श्री. अनिल खडोतकर, उपाध्यक्ष म्हणून सौ. ललिता वरघट व सौ. राणी महल्ले, सचिव म्हणून श्री. आनंद तिडके, कोषाध्यक्ष म्हणून श्री. सुनील भोयर, सहसचिव म्हणून सौ. रेखा राठोड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

विभागीय स्तरावर विभागीय अध्यक्ष म्हणून श्री. कैलास सानप यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच विभागीय कार्याध्यक्ष म्हणून श्री. रमेश चाके, सचिव म्हणून श्री. मिलिंद वणकर, उपाध्यक्ष म्हणून प्रिया नागले, सह सचिव म्हणून प्रियांका गजभिये व कोषाध्यक्ष म्हणून श्री. सुनील भोयर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

आमसभेला नागपूर, भंडारा, गोंदिया व वर्धा विभागातील महिला व पुरुष वनरक्षक व वनपाल  उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री. आनंद तिडके यांनी तर आभार प्रदर्शन श्री. सुनील भोयर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here