युवकाची गळफास घेऊन आत्महत्या…पातुर शहरातील रामनगर येथील घटना…

पातूर – निशांत गवई

पातूर शहरातील उच्चभ्रू वस्ती असलेल्या रामनगर भागात आज सकाळी 11:30 वाजताच्या दरम्यान युवकाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.

सविस्तर वृत्त असे की, रामनगर पातूर येथील रहिवासी रमेश बाबूसिंग चव्हाण वय 34 वर्षे याने आज आपल्या राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना घडली.मागील काही महिन्या अगोदर रमेशच्या आईचा मृत्यू झाला होता.त्याअगोदर काही वर्षांपूर्वी त्याचा भाऊ विनय हा अपघाती निधन पावला होता.

या सर्व घटनांचा परिणाम झाल्यामुळे रमेशला मानसिक आजाराने ग्रासले होते. दोन दिवसांपूर्वीच मानसोपचार तज्ज्ञांकडून रमेश ला औषधगोळ्या आणल्या असल्याचे त्याच्या वडिलांनी सांगितले.रमेशचा भाऊ व आई दोघेही वारल्यामुळे रमेश त्याच्या वडिलांसोबत राहत होता, व गत काही दिवसांपासून सतत आईची आठवण येते.

मला आईजवळ जायचे आहे असे सांगत होता. आई व भावाच्या निधनानंतर एकाकी पडलेल्या रमेशला भावना अनावर झाल्याने रमेश चव्हाण याने मृत्यूला कवटाळले. मोठा मुलगा रमेश,त्यानंतर पत्नी व आता लहान मुलगा रमेश यांच्या मृत्यूमुळे बाबूसिंग चव्हाण यांच्यावर मात्र दुःखाचा डोंगर कोसळला आहे.रमेशच्या मृत्यूमूळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सदर आत्महत्येची माहिती मिळताच पातूर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता सर्वोपचार रुग्णालय, अकोला येथे पाठविण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार गजानन बायस यांच्या मार्गदर्शनाखाली पातूर पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here