तरुण शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या, महेश हेमराज बेहनिया असे मृत शेतकऱ्याचे नाव…

पावसा अभावी मोसंबीचे झाडे वाळल्यामूळे घेतला निर्णय. पावसा अभावी २०० मोसंबीची झाडे वाळली.

अतुल दंढारे नरखेड

नरखेड तालुक्यातील रानवाडी येथील महेश हेमराज बेहनिया वय वर्ष 27 या तरुण शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. तालुक्यातील राणवाडी हे एक छोटेसे गाव आहे या गावात राहणारा तरुण शेतकरी महेश बेहनिया याने एक महिन्यापूर्वी शेतात मोसंबीची 200 झाडे लावली परंतु पावसाने दांडी मारल्यामुळे लावलेली सर्व मोसंबीच्या झाडे वाळली त्यामुळे निराश होऊन महेश बेहनिया या शेतकऱ्याने सोमवरला सकाळी 8.30 च्या सुमारास स्वतच्या शेतात जाऊन विष प्राशन करून आत्महत्या केली.

सततच्या नापिकीमुळे आधीच शेतकरी हवालदिलं झाला आहे त्यात पाऊस दांडी मारत असल्यामुळे या तरुण शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलले आहे. घटने बाबत माहिती मिळताच जलालखेडा पोलीस घटनास्थळी पोहचले व पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जलालखेडा येथील शवविच्छेदन गृहात पाठवण्यात आला. पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास बीट जमादार प्रज्योग तायडे करीत आहे. आत्महत्या करणारा महेश बेहानिया हे तिघे भाऊ व एक बहिण व आई असा मोठा परिवार आहे. वडिलांचे आजारपणामुळे आधीच निधन झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here