पातूर | सस्ती येथे विद्यार्थ्यांची गळफास घेऊन आत्महत्या, सैनिक शाळेत शिक्षण घेण्याचे स्वप्न अधुरे…

पातूर – निशांत गवई

चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सस्ती येथील विद्यार्थ्यांची गळफास घेऊन घेऊन आत्महत्या केल्याची घटना २४ नोव्हेंबर बुधवार रोजी उघडकीस आली आहे. पोलीस स्टेशन चान्नी येथून मिळालेल्या माहितीनुसार सस्ती येथील विद्यार्थी आदित्य दशरथ डाबेराव वय १७ वर्ष या मुलाने निर्गुणा नदीवर असलेल्या त्याच्या शेतातील धुऱ्यावरच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

हा मुलगा सैनिक शाळेत शिक्षण घेण्यासाठी जायचे होते.परंतु दोन दिवसापासून तो बेपत्ता होता.परंतु आज अचानक घडलेल्या घटनेने गावात दुःखाचे वातावरण पसरले आहे.घटनास्थळी चान्नी पोलीस स्टेशन चे ठाणेदार राहूल वाघ यांचे मार्गदर्शनाखाली पी.एस.आय.गणेश नावकार,

बिट अंमलदार बाळकृष्ण येवले, पो.काँ.ज्ञानेश्वर गिते, सुधाकर करवते,रवी घुगे,प्रभारी पोलीस पाटील विजय सरदार,सेवानिवृत्त पोलीस पाटील अरुण बदरखे यांचे उपस्थितीत होती.पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करिता पाठविण्यात आला.पुढील तपास चान्नी पोलीस स्टेशन करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here