Sugandha Mishra and Sanket Bhosle | भांगडयाचा आनंद घेतांना दिसली बहुचर्चीत जोडी सुगंधा आणि संकेत, व्हिडीओ झाला व्हायरल…

कपिल शर्मा शो फेम सुगंधा मिश्रा आणि संकेत भोसले यांनी अलीकडेच लग्नाचे गाठ बांधली आहे. त्या दोघांचे बरेच फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले होते, जे खूप व्हायरल झाले. पुन्हा एकदा सुगंधा मिश्रा आणि संकेत भोसले यांचा एक व्हिडिओ समोर आला असून, हळदी सोहळ्यादरम्यान दोन्ही स्टार जोरदार नाचताना दिसत आहे.

सुगंधा मिश्रा आणि संकेत भोसले यांचा हा व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस येत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर, लोक त्यांच्या नवीन जीवनाच्या सुरुवात बद्दल शुभेच्छा देत आहेत. व्हिडिओमध्ये असे दिसून येत आहे की सुगंधा मिश्रा व तिचा जोडीदार संकेत भोसलेसोबत भांगडा करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये सुगंधा पिवळ्या रंगाच्या साडीसह फ्लावरी ज्वेलरीमध्ये दिसून येते, तर संकेत पांढर्‍या रंगाच्या कुर्त्यामध्ये आकर्षक दिसत आहे.

यापूर्वी एका मुलाखती दरम्यान सुगंधा मिश्रा यांनी सांगितले की, “त्यांनी लग्नाची ऑनलाइन खरेदी केली आहे. त्यांनी डिसेंबरपासून लग्नाची तयारी सुरू केली होती. सुगंधा म्हणाले की,लुधियानामध्ये लग्न सोहळा खासगी होणार असून तेथे फक्त २० लोक उपस्थित असतील. तिने ठरविल्यानुसार तिला १० कि. चाच लेहंगा घालायची इच्छा होती म्हणून जरी मी ऑनलाइन शॉपिंग केली तरी पण १० किलोचा लेहंगा घालेल असे तिने सांगितले. ” 17 एप्रिलला सुगंधा आणि संकेत यांनी आपलं नातं जाहीर केलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here