‘गुम है किसीके प्यार में’ मधील ‘विराट-पाखी’ या जोडीचे असे फोटो झाले व्हायरल…पण…

फोटो - सौजन्य सोशल मिडिया

न्यूज डेस्क – ‘गुम है किसीके प्यार में’ या टीव्ही शोचे मुख्य कलाकार नील भट्ट आणि ऐश्वर्या शर्मा नुकतेच लग्नबंधनात अडकले. या जोडप्याने सात फेरे घेऊन लग्न करावे, अशी दोघांच्या चाहत्यांची बऱ्याच दिवसांपासून इच्छा होती. शोमध्ये भावजयीची भूमिका साकारणारी ही जोडी आता खऱ्या आयुष्यात नवरा-बायको बनली आहे.

सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या ऐश्वर्याने लग्नाच्या अवघ्या 2 दिवसानंतर बेडरूममध्ये क्लिक केलेले काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये नील आणि ऐश्वर्या बेडवर रोमँटिक अंदाजात दिसत आहेत. दोघेही एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत आणि या फोटोंना काही वेळातच प्रचंड लाइक्स आणि शेअर्स मिळाले आहेत.

नील आणि ऐश्वर्याने 30 नोव्हेंबर रोजी उज्जैनमध्ये कुटुंबीय आणि काही जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत सात फेरे घेतले. गुरुवारी दोघांनी रिसेप्शन पार्टी दिली आणि या पार्टीत ज्येष्ठ अभिनेत्री रेखानेही हजेरी लावली. टीव्ही शो ‘गुम है किसीके प्यार में’ हा टीआरपी लिस्टमध्ये टॉप 10 मध्ये राहणाऱ्या शोपैकी एक आहे.

प्री वेडिंग चित्रीकरण

नील आणि ऐश्वर्याचे हे फोटो त्यांच्या हनिमूनचे असल्याचे चाहते म्हणत आहेत, परंतु सेलिब्रिटी कपलचे प्री-वेडिंग फोटोशूट असल्याची माहिती आहे. खरंतर, त्यांचे हे फोटो पाहून अनेक लोक गोंधळात पडले आहेत, पण हे फोटो शेअर करताना ऐश्वर्याने कॅप्शनमध्ये स्पष्टपणे लिहिले आहे की, हे तिचे प्री वेडिंग शूट आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here