रुग्णसेवक आशुतोष शेंगोकार चा असा ही प्रामाणिकपणा…

आशिष सावळे

पेशंटचे नाव शिवा शालिग्राम निहाल राहणार जळगाव यांना एका ट्रक वाल्याला उडवले होते त्यामुळे या पेशंटला पायाला तीन जागी फॅक्चर व डोक्‍याला मार होता अकोला जी एम सी मध्ये निरो सर्जन असल्यामुळे या पेशंटला नागपूर रेफर करण्यात आले होते आणि रेफर केल्यानंतर याला जाण्याची व्यवस्था करून देणे हे हॉस्पिटल ची जबाबदारी होती.

तरीसुद्धा या पेशंटला सकाळपासून संध्याकाळपर्यंत वाट च्या बाहेर काढून दिलं होतं अरे याची जाण्याची व्यवस्था सुद्धा कोणी करून दिली नव्हती या प्रकारचा फोन महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेचे महानगराध्यक्ष आशुतोष शेंगोकार यांना रुग्णांच्या नातेवाईकांचा जसा कॉल आला तसेच ते जीएमसी ला जाऊन पेशंटला भेटले.

महानगर अध्यक्ष आशुतोष शेंगोकार यांच्या समोर नातेवाईकांनी जीएमसी मधील डॉक्टर चा तक्रारी चा पाळा मांडला तेव्हा मी डॉक्टर राजकुमार चव्हाण यांच्याशी संपर्क साधून त्यांना लवकरात लवकर नागपूर जी एम सी मेडिकल कॉलेज येथे नेण्याकरिता त्यांची ऍम्ब्युलन्सची व्यवस्था करून देण्यात यावी.

या विषयावर त्यांच्याशी बोललो तेव्हा राजकुमार चव्हाण साहेब व्हिडिओ कॉन्फरन्स मीटिंग मध्ये बसलेले होते तेव्हा सदर प्रकार त्यांना मी सांगितला तेव्हा जाऊन प्रशासनाचे कुठेतरी डोळे उघडले तेव्हा त्यांनी मला 108 ला फोन करून संपूर्ण माहिती देण्याचे सांगितले व 108 नंबरच्या ॲम्बुलन्स अपघात कक्ष जवळ आली आणि एवढं च नाहीतर त्यांना आर्थिक मदत केली. आणि नागपूर ला रवाना केले. दुसऱ्या दिवशी रुग्णाच्या नातेवाईक चा कॉल आला साहेब आमचा पेशंट च ऑपरेशन चांगलं झालं, तुमचे उपकार नाही विसरू शकत साहेब असे म्हणून आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here