भारताचे अत्यंत घातक अग्नि प्राईम मिसाईल चे सफल परीक्षण…

सोमवारी ओडिशाच्या किना-यावर अग्नि प्राईम म्हणून ओळखल्या जाणार्‍या अग्नि मालिकेच्या नवीन क्षेपणास्त्राची चाचणी भारताने यशस्वीरीत्या पार पाडली, असे डी आर डी ओ चे अधिकारी यांनी सांगितले. डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डीआरडीओ) ने डॉ. एपीजे अब्दुल कलाम बेटातून नवीन पिढीच्या अणु-सक्षम बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी तपासणी सकाळी 10:55 वाजता ओडिशा किनाऱ्यावरुन केली.

“पूर्वेकडील किनारपट्टीवर असणारी विविध टेलिमेट्री आणि रडार स्टेशन या क्षेपणास्त्राचा मागोवा ठेवून परीक्षण करत या क्षेपणास्त्राने लक्ष्याचा अचूक पाठपुरावा केला असून सर्व मिशनची उद्दीष्टे अचूकतेने पूर्ण केली आहेत, असे डीआरडीओने एका निवेदनात म्हटले आहे.

अग्नि प्राईम हा डीआरडीओने सुरू केलेल्या अग्नि क्षेपणास्त्राचा पहिला टप्पा आहे. या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचे वजन अग्नि 3 च्या तुलनेत 50% कमी आहे. हे क्षेपणास्त्र अतिशय अत्याधुनिक असून ते रेल्वे व रस्ता येथून सुध्दा प्रक्षेपित केले जाऊ शकते आणि दीर्घ कालावधीसाठी तेथे ठेवता येते आणि ऑपरेशनल आवश्यकतेनुसार संपूर्ण देशभरात वाहतूक केली जाऊ शकते.

हे क्षेपणास्त्र अत्यंत घातक असून छुप्या पद्धतीने शत्रूंवर वार करू शकते. सदरचे क्षेपणास्त्र हे अन्वस्त्र सुद्धा वाहून नेऊ शकते व दोन हजार किलोमीटर पर्यंत वार करू शकते यामुळे भारताच्या शक्तीत कैकपटींनी वाढ झालेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here