डहाणू – जितेंद्र पाटील
पालघर सा. बा. विभाग मधील कनिष्ठ सहाय्यक, प्रकाश बाबू पागी वय 46 वर्ष असून त्यांनी सब कॉन्ट्रॅक्टर कडून दि 8ऑक्टोबर रोजी सहा हजार रुपयांची मागणी केली होती. आज दि १२ ऑक्टोबर रोजी सहा हजार ची लाच घेताना रंगेहाथ पकडून अँटी करप्शन ब्युरो ने अटक केली.
यशस्वी सापळा
▶️ युनिट – पालघर
▶️ तक्रारदार- पुरुष, वय- ४८ वर्षें,
▶️ आरोपी- प्रकाश बाबू पागी, वय ४६ वर्ष, कनिष्ठ सहाय्यक, सा. बा. विभाग जिल्हा परिषद पालघर.
▶️ लाचेची मागणी- ६,०००/- रुपये,
▶️ लाच स्विकारली- ६,०००/ रुपये
▶️ हस्तगत रक्कम- ६,०००/-रुपये
▶️ लाचेची मागणी – ता.०८/१०/२०२०
▶️ लाच स्विकारली – ता. १२/१०/२०२० रोजी १३:०५ वाजता
▶️ लाचेचे कारण -. तक्रारदार हे सब कॉन्ट्रॅक्टर असुन रस्त्याचे काम घेतले होते. सदर कामाचे बिल मंजूरी करिता ६,०००/- रु. लाचेची मागणी करून आज रोजी ६,०००/-रु. लाचेची रक्कम पंचासमक्ष स्वीकारली.
▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली असून फोटोग्राफ घेण्यात आले आहेत.
▶️ सापळा पथक – भारत साळुंखे पोलीस निरीक्षक, मपोह/मांजरेकर, पोना /सुवारे, पोना/सुतार, पोना/पालवे, पोना/ सुमडा, पोना/चव्हाण , पोशी/ उमतोल, चापोशि/ दोडे,
आलोसे यांचे सक्षम अधिकारी – मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पालघर
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.
अँन्टी करप्शन ब्युरो,ठाणे, कॅम्प पालघर
@ दुरध्वनी 02525-297297
मोबा.क्रं*99234699430
@ टोल फ्रि क्रं. 1064