नैसर्गिक आपत्ती निवारणार्थ शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळण्याकरिता ग्रामपंचायत कवठा मार्फत उपविभागीय अधिकारी यांना निवेदन…

मूर्तिजापूर – संदीप शिरसाट सह अजय गायकवाड

कुरुम मागील काही दिवसांपासून सतत चालू असलेल्या पावसामुळे शेताचे अतोनात नुकसान झालेले आहे शेतामध्ये पाणी शिरल्यामुळे पाणी जिरण्याची क्षमता पूर्ण झाली आहे त्यामुळे कापूस, सोयाबीन, तूर पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे विहिरी व बोरवेल ओसंडून वाहत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावून घेण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

देशाचे पोट भरणाऱ्या शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ येऊ शकते अशा परिस्थितीत शासनाने शेतकऱ्यांना मदत करणे आवश्यक आहे. अशा भयानक परिस्थितीत पंचनामे न करता वेळ घालवण्यापेक्षा प्रत्येक शेतकऱ्याला सरसकट 50 हजार रुपये प्रति हेक्टर मदत शासनाकडून देण्यात यावे असे निवेदन शेतकऱ्यांना मार्फत ग्रामपंचायत कवठा येथील सरपंच शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here