उपनिरीक्षक अनिल कुंभार यांनी निपाणी ग्रामीणचा पदभार स्विकारला…

राहुल मेस्त्री

निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे तात्कालीन उपनिरीक्षक बी एस तळवार यांची बेळगाव येथील नागरी हक्क संचालनालय येथे बढती मिळुन बदली झाल्यानंतर निपाणी ग्रामीण ठाण्याचा अतिरिक्त कार्यभार निपाणी शहर उपनिरीक्षक अनिल कुंभार पाहत होते.

यामध्ये ते कर्नाटक सिमेवरील कोगनोळी सिमातपासणी नाक्यांवर अतिरिक्त कार्यभार असताना देखील अनेकदा वेळोवेळी लक्ष ठेऊन असायचे.दि.2 आँगस्ट रोजी उपनिरीक्षक अनिल कुंभार यांनी निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक म्हणून रितसर कार्यभार स्विकारला..याआधी त्यांनी सदलगा पोलीस ठाणे त्यानंतर निपाणी शहर उपनिरीक्षक म्हणून सेवा बजावली आहे.

आत्ता निपाणी ग्रामीणचा पदभार स्विकारल्यानंतर ग्रामीण अंतर्गत येणाऱ्या कोगनोळी सिमातपासणी नाक्यावरील एक मोठी जबाबदारी पडली असुन महाराष्ट्रासह इतर राज्यातून येणाऱ्या वाहणावर कोरोणाच्या पाश्र्वभूमीवर ते बारकाईने नजर ठेऊन आहेत….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here