स्टडी ग्रूपची टीसाइड युनिव्हर्सिटीशी हातमिळवणी…

आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या भविष्याला आकार देण्यासाठी आले एकत्र…

न्युज डेस्क – आघाडीच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण प्रदाता स्टडी ग्रूपने टीसाइड युनिव्हार्सिटीशी स्ट्रॅटेजिक भागीदारीची घोषणा केली आहे. टीसाइड युनिव्हर्सिटी एक अशी संस्था आहे, जी आपल्या संचालनाच्या केंद्रस्थानी विद्यार्थ्याच्या रोजगारीवर फोकस करते, जेणे करून आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना डिग्री स्तराचे शिक्षण मिळवण्याची अतिरिक्त संधी देता यावी. हळू हळू करता बर्‍याच व्यापक आणि वैविध्यपूर्ण रेंजच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना ही युनिव्हर्सिटी सेवा देत आहे.

टीसाइड युनिव्हर्सिटीचा पूर्ण फोकस वर्कफोर्स स्किल डेव्हलपमेंटवर आहे, आणि अॅडोब क्रिएटिव्ह कॅम्पस म्हणून नावारूपाला येणारी ही पहिली युरोपियन हायर एज्युकेशन संस्था आहे. ही संस्था विद्यार्थ्यांना जागतिक कंपन्यांच्या मागणीस अनुरूप डिजिटल स्किल्स शिकण्याची संधी देते.

व्यवसाय आणि विद्यार्थ्यांच्या रोजगार-अनुरूपतेमध्ये संधान साधण्याची आपली प्रतिबद्धता दर्शवत टीसाइड युनिव्हर्सिटीमधील स्टडी ग्रूपचे पाथवे प्रोग्राम हे व्यावसायिक क्षमता असणार्‍या या क्षेत्रातील सक्रिय लेक्चरर्सद्वारा वितरित करण्यात येतील.

स्टडी ग्रूपच्या सीईओ एमा लँकेस्टर म्हणाल्या, ‘यूकेच्या टीसाइड युनिव्हर्सिटीशी भागीदारी करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. ही युनिव्हर्सिटी विद्यार्थी, उत्तम शिक्षण आणि त्यांच्या भावी कारकिर्दीच्या यशाला हातभार लावण्याचे कार्य आपल्या संचालनाच्या केंद्रस्थानी ठेवते. कोर व्यावसायिक दक्षतांबरोबर अभ्यासाच्या आपल्या निवडलेल्या क्षेत्रात शैक्षणिक कार्यक्षमता विकसित करण्याच्या प्रयत्नात आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना ही युनिव्हर्सिटी ज्या प्रकारे मदत करते, ते पाहून आम्ही प्रभावित झालो आहोत.’

टीसाइड युनिव्हर्सिटीचे कुलगुरू आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. पॉल क्रोनी म्हणाले, “टीसाइड युनिव्हर्सिटी एक जागतिक संस्था आहे, ज्यामध्ये १०० पेक्षा जास्त देशांमधील विद्यार्थी आजवर शिकून गेले आहेत.

दर्जेदार, डिजिटल प्रेरित आणि व्यवसायाशी सुसंबद्ध प्रोग्राम सादर करण्यासाठी स्टडी ग्रूपशी भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. ही भागीदारी शिक्षणाच्या माध्यमातून जीवनात परिवर्तन आणण्याच्या आमच्या महत्त्वाकांक्षेस अनुसरून आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना डिग्री स्तरीय अभ्यासात प्रगतीच्या संधी प्रदान करेल.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here