पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना विनापरीक्षा पास करणार…शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड

न्यूज डेस्क – राज्यात कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता या यावर्षीही विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहावे लागणार असून राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थांना परीक्षा न देताच पास करून पुढील वर्गात प्रवेश मिळणार असल्याची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड ट्वीटर ला व्हिडिओ सामायिक करीत माहिती दिली आहे.

राज्यात कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. मधल्या काळात ऑफलाइन शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. काही ठिकाणी पाचवी ते आठवी पर्यंत शाळा सुरू करण्यात आल्या. तर काही ठिकाणी सुरू करू शकलो नाही. पण कोरोनाची परिस्थिती पाहता पहिली ते आठवीचे विद्यार्थी आहे, त्यांची परीक्षा घेणे शक्य नाही, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.

राज्यात शिक्षण हक्क कायद्याप्रमाणे इ. 1 ली ते इ. 8 वी साठी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन सुरू असल्याने शिक्षकांनी आकारिक मूल्यमापन करणे अपेक्षित आहे आणि ते करीत आहेत मात्र संकलित मूल्यमापन करता आले नाही. या स्थितीत शैक्षणिक वर्ष 2020- 21 मधील कोविड 19 ची अपवादात्मक परिस्थिती पाहता  इ. 1 ली ते इ. 8 वी च्या विद्यार्थ्यांना बालकांचा मोफत व सक्तिचा शिक्षण हक्क कायदा 2009 नुसार सरसकट वर्गोन्नती देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे, असं गायकवाड यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here