कोरोना योद्धयांना नमन करीत शाळेत विद्यार्थ्यांचा प्रवेश…

पातुरच्या किड्स पॅराडाईज मध्ये अभिनव प्रवेशोत्सव…

पातूर – निशांत गवई

कोरोना रोखण्यासाठी आपल्या जीवाचे रान करणाऱ्या कोरोना योद्धाना नमन करीत पातुरच्या किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलमध्ये अभिनव पद्धतीने शाळा प्रवेशोत्सव पार पडला.कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्याने दोन वर्षांपासून बंद असलेल्या शाळा सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यानुसार इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरु झाल्या आहेत.

पातूर येथिल किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूल च्या विद्यार्थ्यांनी कोरोना योद्धा्यांना नमन करीत शाळेत प्रवेश केला. कोरोना लढ्यात आपल्या जीवाची पर्वा न करता झटणारे डॉक्टर, नर्स, पोलीस, आरोग्य कर्मचारी, सफाईकामगार, पत्रकार, शेतकरी, समाजसेवक, विजकर्मचारी, जवान, शिक्षक, शस्त्रज्ञ् या कोरोना योद्धा्यांना विदयार्थ्यांनी नमन करीत त्यांचे आभार मानले. त्यांच्या योगदानमुळेच शाळा सुरु करण्याची अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.

अशी भावना व्यक्त करीत विदयार्थ्यांनी शाळेत प्रवेश केला. यावेळी कोरोना काळात स्वतःची आणि परिवाराची काळजी घेण्याची शपथ विदयार्थ्यांनी घेतली.ही अभिनव संकल्पना शाळेचे संस्थापक अध्यक्ष गोपाल गाडगे आणि कार्यकारी संचालिका सौ ज्योत्स्ना गाडगे यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आली.

यावेळी अंकित पाटील, कृष्णा सरप, आनंद राठोड, पूर्वा बंड, निधी बंड, मिताली उगले,भक्ती गाडगे, सय्यद शाहिद, क्षितीज सोनोने,पार्थ तेलंगडे,सिद्धी पाकदुने,चेतन ठाकरे,आर्यन बोचरे आदींनी कोरोना योद्धाची वेशभूषा साकारली.उपक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक चंद्रमणी धाडसे, नरेंद्र बोरकर, वंदना पोहरे, सुलभा परमाळे, नितु ढोणे, शीतल कवडकर, किरण दांडगे, अश्विनी अंभोरे, अविनाश पाटील, बजरंग भुजबटराव, रुपाली पोहरे, शुभम पोहरे आदींनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here