बेरोजगारांसाठी झटणार…! रवी मगर

बुलढाणा – अभिमान शिरसाट

भारतीय बेरोजगार मोर्चाच्या वतीने दिनांक 5 एप्रिल 2021 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेबांना जिल्हाधिकारी बुलढाणा यांचे मार्फत बेरोजगारांच्या विविध समस्यांचे निवेदन सादर केले.निवेदनात नमूद करण्यात आले की, गृह विभागातील पोलीस भरती व अन्य शासकीय विभागातील रिक्त पदांचा अनुशेष त्वरित भरून, राज्य सरकारने पोलीस भरती त्वरित करावी,

ज्या बेरोजगारांनी वयाची अट ओलांडली आहे त्या बेरोजगारांना नोकरीसाठी वयाच्या अटीत सवलत द्यावी, विविध विभागात रिक्त असलेल्या जागेच्या जाहिराती काढून राज्यातील बेरोजगारांना प्रतिनिधित्व द्यावे, सुशिक्षित बेरोजगार युवकांना बेरोजगार भत्ता प्रदान करण्यात यावा, अशा स्वरूपाची मागणी निवेदनात करण्यात आली. ही मागणी महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यासह बुलढाणा जिल्ह्यातही करण्यात आली.

भारतीय बेरोजगार मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रवी मगर यांनी महा व्हॉइस च्या जिल्हा प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की, महाराष्ट्रातील तसेच जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या रोजगारासाठी तसेच नोकरीसाठी वेळोवेळी भारतीय बेरोजगार मोर्चाच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. व बेरोजगारांसाठी व त्यांच्या समस्यांच्या निराकरणासाठी सदैव झटणार असे सांगितले.

यावेळी बुलढाणा जिल्हा अध्यक्ष रवी मगर यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. निवेदन देतेवेळी भारतीय विद्यार्थी मोर्चा चे महाराष्ट्र राज्य प्रशिक्षक अजय जाधव, भारतीय बेरोजगार मोर्चाचे राज्य उपाध्यक्ष सुधीर सोनटक्के, भारतीय विद्यार्थी मोर्चा चे सदस्य अरविंद खरात सह अन्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here