मुलांमध्ये प्रबळ इच्छाशक्ती, विनयशीलता व संयम वाढवावा…गणेश हाके

अहमदपूर – बालाजी तोरणे

संत ज्ञानेश्वर विद्यालयात ऑनलाईन पालक मेळावा संपन्न. अहमदपूर-मुलांना नाही हा शब्द ऐकण्याची सवय लावली पाहिजे.त्यांच्यामध्ये प्रबळ इच्छाशक्ती, विनयशीलता व संयम हे गुण वाढवले पाहिजेत. असे आवाहन गणेश हाके यांनी संत ज्ञानेश्वर विद्यालयातील ऑनलाईन पालक मेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना केले.

येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयात इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत च्या पालकांचा ऑनलाईन पालक मेळावा घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मा. गणेशदादा हाके पाटील प्रमुख पाहुण्या संस्थासचिव प्राचार्या रेखाताई तरडे हाके मॅडम तसेच पालक मेळाव्यास प्रमुख मार्गदर्शक म्हणून मारोती कदम सर उपस्थित होते.

प्रथम विद्यालयाची विद्यार्थीनी तन्वी पस्तापूरे हिने स्वागत गीताने ऑनलाइन उपस्थित पालकांचे स्वागत केले. त्यानंतर मारोती कदम सर यांचे तब्बल दीड तास कानमंत्र आई-बाबांना,मुल जिद्दी का होतात, पालकांचे प्रकार, विद्यार्थ्यांचे प्रकार ,मुले यशस्वी होण्यासाठी आपल्या पाल्यांच्या संस्कारमय प्रगतीसाठी 21 गुणी पाल्य असा एक जीवनमंत्र कानमंत्र त्यांनी यावेळी उपस्थित पालकांना दिला.

यावेळी शाळेच्या बहुसंख्य पालकांनी पूर्णवेळ उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घेतला. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका आशा रोडगे उद्धव शृंगारे सह विद्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका आशा रोडगे यांनी तर सूत्रसंचलन सतीश साबणे व आभार शारदा तिरुके यांनी मानले शेवटी ञिगुणा मोरगे यांनी पसायदान घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here