प्रलंबित मागण्यांसाठी परिचारिकांचे कामबंद आंदोलन…१ ते ७ सप्टेंबर काळ्या फिती लावून करणार निषेध…८ ला कामबंद आंदोलन…

नागपूर – शरद नागदेवे

नागपूर जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत परिचारिकांच्या मागण्यांकडे शासनाकडून सासत्याने दुर्लक्ष होत असून.त्यांचा मागण्या शासन दरबारी बऱ्याच कालावधीनंतर सूध्दा प्रलंबित आहेत.शासनाने दिलेले आश्र्वासनही पाळले नाही.

मागण्या प्रलंबित असल्याने त्यांना आर्थिक अडचणीला तोंड द्यावे लागते.त्यामुळे जिल्हा परिषद नागपूर येथील संतप्त परिचारिकांनी १ संप्टेंबर पासून आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.दोन टप्यात हे आंदोलन करण्यात येणार आहे.

आरोग्यसैविकांचे रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावी,पदे भरतांना कंत्राटी सेविकांचा प्राधान्याने विचार करावा, बंदपत्रित आरोग्यसेविका महिलांची सेवा रुजू दिनांकापासून गूहीत त्यांना सेवेत कायम करावे,

प्राथमिक आरोग्यकेंद्र स्तरावर काम करणाऱ्या स्त्री-पुरूष कर्मचाऱ्यांना जॉब चार्ट ठरवून देत कामाची योग्य जवाबदारी सोपवावी,आरोग्यसेविकांचा कामाचे तास ठरवून शिप्टप्रमाणे ड्युटी द्यावी,

यासह अन्य मागण्या पुष्कळ दिवसांपासून प्रलंबित असल्याने महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद संघटनेचा नागपूर शाखेने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.या अंतर्गत परिचारिका १ ते ७ संप्टेबंर टाळल्या फीती लावून काम करणार असून ८ सप्टेंबरला काम बंद करणार असल्याचे नागपूर जिल्हा परिषद नर्सेस संघटनेचे अध्यक्ष आशा पाटील,

कार्याध्यक्ष संगीता गायकवाड, सरचिटणीस कविता बोदंरे, कोषाध्यक्ष रजनी ठाकरे यांनी कळवले आहे.आंदोलना संबंधीत माहिती, जिल्हा परिषद नागपूर चे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना कळविण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here