अमरावतीत कडकडीत लॉकडाउन…पोलीस आयुक्त उतरल्या रस्त्यावर…

मयुरी मिठ्ठानी, अमरावती

काल रात्रीपासून अमरावती शहरात लॉकडाऊन सुरू झालाय…अमरावती आणि अचलपूर शहरात एका आठवड्यासाठी लॉकडाऊन करण्यात आलाय….शहरात आज अनेक ठिकाणी रस्त्यावर शुकशुकाट बघायला मिळाला आहे. शहरातील मुख्य चौकात पोलिसांचा मोठा बंदोबस्त यावेळी तैनात करण्यात आला आहे….

तर आज अमरावती शहराच्या राजकमल चौकात पोलीस कमिशनर आरती सिंग स्वतः फिल्डवर उतरून .विनाकारण फिरणाऱ्या लोकांची विचारपूस करीत आहेत….अमरावती मध्ये गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी अमरावतीमध्ये लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे.. अनलॉक नंतर आठवडाभर याचा लॉकडाऊन जाहीर झालेलं अमरावती हे पहिले शहर आहे….

जीवनावश्यक वस्तू करिता दुकानांना काहीही शिथिलता देण्यात आली आहे.. सकाळी 8 ते दुपारी 3 वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तू घेता येणार आहे.. त्यानंतर विनाकारण फिरणाऱ्यावर पोलिसांची करडी नजर असणार आहे..

विनाकारण फिरताना आढळल्यास त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाची साखळी कशी तुटेल याकडे जिल्ह्यप्रशासनाचे लक्ष लागले आहे….महाव्हाईस साठी ,मयुरी मिथानी, अमरावती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here