शासन मदतिपासून कोणी वंचित राहता कामा नये…खा.पटेलांचे तालुका प्रशासनाला सक्त निर्देश…पूरग्रस्त गावांना दिली भेट…

लाखांदूर – नास्तिक लांडगे

पुराने बाधित गावांचे पंचनामे करतांना त्याचे चावडी वाचन करुन अंतीम यादी जाहिर करावी.पुराने बाधित कोणी गरिब शासन मदतीपासून वंचित राहता कामा नये असे सक्त निर्देश राज्यसभा खा. प्रफुल्ल पटेल यांनी लाखांदूर तालुका प्रशासनाला दिले.सदर निर्देश 6 सप्टें.

रोजी लाखांदूर तालुक्यातील पूरग्रस्त गावांच्या भेटीदरम्यान दिले.ते म्हणाले पुरामुळे तालुक्यातील नदीकाठावरील गावातील शेती व घरांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे वास्तव आहे.या परिस्थितीत बाधित लोकांना शासन मदत होत असताना कोणीही वंचित राहणार नाही यासाठी प्रशासनाने प्रत्यक्ष गावात चावडी वाचन करुन लाभार्थ्यांची यादी प्रसिध्द करावी अशा देखील सुचना दिल्या.

यावेळी तालुक्यातील खैरी/पट,गवराळा, मोहरणा, ,इटान आदी गावांना भेट देतांना गावक-यांच्या समस्या जाणुन घेत निवेदने स्विकारली. दरम्यान पूरग्रस्त गावांची पाहणी व भेट दौ-यात माजी राज्यमंत्री नाना पन्चबूद्धे ,माजी आ.राजेंद्र जैन,धनंजय दलाल, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे,

लाखांदूर राकॉ शहर अध्यक्ष एड.मोहन राऊत,रेशिम परशुरामकर,संतोष गोंधोळे, कृउबास उपसभापती देवीदास राऊत,सरपंच मंगला शेंडे,वैशाली हटवार, सुनिता बिसेन,प्रमिला लंजे,निता लंजे,कल्पना जाधव, तहसिलदार संतोष महाले,ठाणेदार शिवाजी कदम,बिडिओ जी.पी.अगर्ते,ताकृअ.शेन्नेवाड यासह अन्य अधिकारी कर्मचारी,पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here