ST कर्मचाऱ्यांच्या पगारात घसघशीत वाढ…विलीनीकरणासाठी असे बोलले अनिल परब…जाणून घ्या

मुंबई

एसटी संपावर तोडगा काढण्यासाठी परिवहन मंत्री अनिल परबांनी यांनी पत्रकार परिषद घेत एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात ४१% मोठी वाढ केली असून सोबतच विलीनीकरणासाठी समितीचा जो ही निर्णय येईल तो राज्य सरकार मान्य असल्याचे ते बोलते होते.

अनिल परब यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. यावेळी मंत्री उदय सामंत, भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत उपस्थित होते. आम्ही सरकारतर्फे एक प्रस्ताव ठेवला. विलीनीकरणाचा निर्णय समितीने सरकारडे दिला तर तो मान्य असेल. पण तो निर्णय येईपर्यंत किंबहूना निर्णय होईपर्यंत तिढा असाच ठेवता येणार नाही. त्यामुळे सरकारने कामगारांच्या पगारात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही वाढ त्यांच्या मूळ पगारात करण्यात येणार आहे. डीए दिला जातो, तो राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे दिला जातो. घरभाडे भत्ताही सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे दिला जातो.

पगारवाढ राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे देण्याचं आश्वासन दिलं होतं. करारात तसं होतं. विषय बेसिकचा होता. जे कर्मचारी एक वर्ष ते १० वर्ष कॅटेगिरीत आहेत. त्यांच्या मूळ वेतनात पाच हजाराची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे, असं परब यांनी सांगितलं.

ज्याचं मूळ वेतन १२ हजरा ८० होतं त्यांचं वेतन १७ हजार ८० रुपये झालं आहे. ज्यांच मूळ वेतन १७ हजार होतं. त्यांना २४ हजार पगार होणार आहे. ही वाढ ४१ टक्के आहे. आतापर्यंतच्या एसटीच्या इतिहासातील सर्वात मोठी वाढ आहे. १० ते २० वर्षापर्यंतच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात ४ हजाराने वाढ केली आहे. ज्यांचा पगार १६ हजार होता. त्यांचा पगार २३ हजार ४० झाला आहे. वाढ केल्यानंतर त्यांचा पगार २८ हजार झाला आहे. २० वर्षापर्यंतच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात दोन हजाराने वाढ केली आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here