अमरावती संचारबंदीच्या आदेशात बदल…जाणून घ्या

दिनांक १३.११.२०२१ रोजी अमरावती शहरामधे अचानक जमावाने हिंसक वळण घेउन व शहरामध्ये तोडफोड सुरु केली होती त्यामध्ये सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होवुन जिवीत हानी होण्याची सकृत दर्शनी परिस्थिती निर्माण झालेली होती. अमरावती शहरातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरीता, प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरीता कलम १४४ जाफौ प्रमाणे संपुर्ण संचारबंदीचे (कर्फ्यू) आदेश निर्गमित करण्यात आलेले आहे.

अमरावती शहरामधिल नागरीकांच्या अडीअडचणी लक्षात काहीवेळे करीता संचारबंदी मधे शिथिलता आदेश निर्गमीत करण्यात आलेले आहे. दिनांक २२.११.२१ रोजी भारतीय जनता पार्टी तर्फे संपुर्ण महाराष्ट्रात धरणे आंदोलन असुन ते जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करणार आहे. तसेच वंचित बहुजन आघाडी तर्फे मुस्लीम समाजाला ५ टक्के आरक्षण मिळावे याकरीता सुध्दा राज्यव्यापी आंदोलन पुकारलेले आहे.

दिनांक २२.११.२१ रोजी कोणताही अनुचीत प्रकार होणार नाही याकरीता दिनांक २२. ११.२०२१ रोजी सकाळी ०९.०० ते संध्याकाळी १८.०० वा पर्यंत ५ किंवा ५ पेक्षा जास्त व्यक्ती एकत्रीत जमा होणार नाही असा सुधारीत आदेश मा. डॉ आरती सिंह पोलीस आयुक्त अमरावती यांनी पारित केलेला आहे. अमरावती शहरातील सर्व नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन मा. डॉ.आरती सिंह पोलीस आयुक्त अमरावती यांनी केलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here