पुलावरून चार फूट पाणी वाहत असल्याने पेंढरी – मानेगावं (कला) गावाचा संपर्क तुटला…

देवलापार – पुरुषोत्तम डडमल

काल रात्री ११:३० वाजताच्या सुमारा पासून परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. रात्रभर सतत मुसळधार पाऊस बरसल्याने देवलापार पासूूून पाच किमी अंतरावर असलेल्या देवलापार -वरघाट तसेच पेंढरी- मानेगावं(कला) रस्त्यारावरील पुलावरून चार फूट पाणी वाहत असल्यामुळे मानेगावं (कला) व देवलापार – वरघाट या गावाचा संपर्क तुटला होता.

देवलापार वरून कट्टा,पेंढरी मार्गे मानेगावं,हिवरा- बाजार,सालई,टांगला गावाकडे जाणाऱ्याना पुलावर पाणी वाहत असल्यायाची कल्पना नसल्याने अनेकांना वरघाट नाल्यावरून देवलापार ला परत येऊन पवनी मार्गे फिरून जावे लागले.पावसाळ्याच्या या तीन महिन्यात जितका पाऊस पडला नाही तितका पाऊस काल रात्री पडल्याने परिसरातील नदी,नाले व तलाव तुडुंब भरले आहे. परिसरात दोन-तीन दिवसांपासून पाऊसचा जोर कायम आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here