प्रेमाची अजब शिक्षा…प्रियकराचा खाजगी भाग कापून त्याची केली होती हत्या…आणि मग…

फोटो- सौजन्य News24

न्यूज डेस्क – बिहार मध्ये अपराधाच्या विचित्र घटना घडतात की, ऐकून अंगावरील शहारे उभे होतात. अशीच एक घटना शनिवारी मुजफ्फरपूरमधील कांती पोलिस स्टेशन अंतर्गत घडली असून प्रियकराचा लोखंडी रॉडने त्याचा खासगी भाग कापून मारहाण करून त्याची हत्या करण्यात आली होती.

त्या युवकाचा मृतदेह गावात पोहोचला तेव्हा लोक संतप्त झाले. मुलाचा मृतदेह घेऊन सोनबरसा गावी पोहोचले आणि मुलीच्या घराच्या दारासमोर त्यांचा अंतिम संस्कार केल्या गेला. त्यामुळे संपूर्ण गावात तणावामुळे पोलिस बंदोबस्त मोठ्या संख्येने तैनात असून लोक शांततेसाठी आवाहन करीत होते.

शनिवारी दुपारी युवकाचा मृतदेह त्याच्या गावी पोहोचला. तिथे पोहोचल्यावर संपूर्ण गाव आक्रोश करायला लागले. या घटनेनंतर संतप्त झालेल्या रामपूर साह गावातील लोक मृतदेह घेऊन सोनबरसा गावात पोहोचले. येथील तणावाची परिस्थिती पाहून पोलिसांनी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला. तर येथे प्रियसीच्या कुटुंबांनी घराला कुलूप लावून पळ काढला. मृताच्या नातेवाईकांनी आरोपीच्या दारात अंत्यसंस्कार केला.

संपूर्ण प्रकरण काय आहे ते जाणून घ्या…

ही घटना मुजफ्फरपूरमधील कांती पोलिस स्टेशन परिसरातील रामपूर साह गावची आहे. येथे राहणारे सौरभ कुमार (वय 23) यांचे सोनबरसा गावातील एका मुलीशी प्रेमसंबंध होते. शुक्रवारी रात्री उशिरा तो सोनबरसा गावात आपल्या मैत्रिणीला भेटायला गेला होता. मुलगी जेव्हा त्या युवकाला भेटायला निघाली तेव्हा मुलीच्या कुटुंबीयांना संशय आला म्हणून ते मुलीचा पाठलाग करून तेथे पोहोचले. त्यांनी त्या दोघांना रेड हेंड पकडले. मुलीचे कुटुंबीय या युवकासह घरी आले आणि त्यांनी रात्रभर त्याला लोखंडी रॉड, लात-काठ्यांनी मारहाण केली.

अजून त्याचा राग संपला नाही, तेव्हा त्यांनी धारदार शस्त्राने युवकाचा खाजगी भाग तोडला. यामुळे तो बेशुद्ध पडला आणि त्याचा मृत्यू झाला. त्याला उपचारासाठी साठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि युवकाच्या कुटुंबीयांना माहिती दिल्यानंतर तेथून पळ काढला. शवविच्छेदन करून खासगी भाग तोडल्याचीही पुष्टी झाली आहे. पोलिसांनी आरोपी पक्षाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. घर सोडल्यानंतर मुलीचे कुटुंबातील सदस्य फरार झालेत. सध्या या भागात पोलिस बंदोबस्त तैनात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here