Breaking | मूर्तिजापूर |सोनोरी जवळ विचित्र अपघात…१ ठार चार जखमी

मूर्तिजापूर – राष्ट्रीय महामार्ग 6 वरची अपघाताची मालिका थांबायचं नाव घेत नसून आज सकाळी पुन्हा एक विचित्र अपघात सोनोरी जवळील घडला असून यात 1 जण ठार असल्याची सध्या माहिती मिळत असून मृतकाची संख्या आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे माहिती मिळाली आहे.

मूर्तिजापूर येथून जवळच असलेल्या सोनोरी गावाजवळील अरुंद पुलावर अकोल्याहून येणारा आणि अमरावती जाणारा असे दोन्ही ट्रक आपसात भिडले मात्र बाजूला जात असलेला दुचाकीस्वार या अपघाताच्या तावडीत सापडला त्याचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे.

घटनेची माहिती गावकर्यांना मिळताच घटनास्थळावर बघ्यांची गर्दी वाढली, तर दुचाकीस्वार हा ट्रक खाली असल्याने त्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here