वीज ग्राहकांची प्रचंडलूट थांबवा…! सरासरी बील ऐवजी रिडींग प्रमाणे बिलंद्या.! सम्राट मित्रमंडळाची मागणी….

बालाजी तोरणे – अहमदपूर

अहमदपूर . लॉकडाऊनच्या कालावधीनंतर मीटर रिडींग न घेता सरसकट तींन महिन्याचे वीजबिल ग्राहकांना देऊन त्यांची लूट करण्यात येत असून नविन रिडींग प्रमाणे बिले द्या अशी आग्रही मागणी सम्राट मित्रमंडळाच्या वतीने युवक नेते डाॅ सिध्दार्थकूमार सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे केली आहे.

येथील उपजिल्हाधिकारी यांच्या कडे दिलेल्या निवेदनात पूढे म्हटले आहे की, वीजबिलाची रक्कम भरण्यासाठी सुलभ हप्ते करून देण्यात येईल, अशी घोषणा शासनाने करून ग्राहकांना सवलतीचे गाजर दाखविले आहे.तथापि ही सवलत नसून सवलतीच्या नावाखाली शासकीय लूट आहे असं म्हणायला वाव आहे.लाॅकडावूनच्या कालावधीत वीज ग्राहकांची मीटर रिडींग घेण्यात आली नाही.

त्यामुळे एप्रिल व मे महिन्यात ग्राहकांना सरासरी वीज वापरानुसार बिल देण्यात आले. मार्चनंतर प्रथमच थेट जूनमध्ये मीटर रिडींग घेण्यात आले. त्यामुळे मार्च ते जून पर्यंतचे रिडींग घेऊन एकूण वीजवापराचे एकत्रित बिल ग्राहकांना देण्यात आले. हे सरासरी बील आकारताना एकूण तीन महिन्याचे बिल एकत्र केल्याने युनिट पाचशेच्यावर जाताच त्या मूळे विज दरात मोठी वाढ होत आहे.

कारण एकत्रित बिलामुळे वीज आकारात वाढ झाली आहे.वीज बिल आकारणी करताना घरगुती वीज ग्राहकास १०० युनिट पर्यंतचा दर हा २,५७ पैसे अधिक इंधन समायोजन आकार घेतला जातो. १०० ते ३०० युनिट पुढे ४,५५ पैसे अधिक इंधन समायोजन आकार लावला जातो.३०० ते ५०० युनिटचा ६,५१ पैसे तर ५०१ ते १००० युनिट पर्यंत ७,५५ पैसे आणि १००० युनिट पुढे हा आकार ७,८१ पैसे आहे.

ही दर आकारणी पाहता दरमहा १०० ते ३०० युनिट साठी ४,५५ पैसे अधिक इंधन समायोजन आकार असलेल्या ग्राहकांना सरासरी बिलामूळे ५०० युनिट पेक्षा अधिकचा ७,५५ पैसे दर लावण्यात आला आहे. त्यामुळे वीज बिलात जवळ जवळ दुप्पटीने वाढ झाली आहे. हा ग्राहकाच्या खिश्यावर टाकलेला सरकारी दरोडा असून महावितरणची ही मनमानी आहे.

एक महिन्यापेक्षा अधिक कालावधीचे वीजबिल असल्याने स्लॅब बेनिफिट देण्याचे तसेच ग्राहकांनी एप्रिल व मे मध्ये सरासरी वीजबिलांची रक्कम भरली असल्यास त्या रकमेचे समायोजन करण्यात येईल,चुकीच्या बिलाची दुरुस्तीसाठी तत्परतेने कार्यवाही करण्यात यावी व ग्राहकांना चुकीच्या वीजबिलांचा जूनमध्ये देण्यात येत असलेली वीज बिले ही लॉकडाऊनच्या कालावधीत ग्राहकांनी वापरलेल्या सरासरी युनिट प्रमाणे दिले आहे. त्यामध्ये ग्राहकांना लुटण्यात येत आहे.

तरी वीज ग्राहकांनी ही अवास्तव वीज बिले भरू नये.सरासरी बिल न घेता दरमहा बिल (तीन स्वतंत्र बिल) घेऊनच वीज बिलाचा भरणा करावा असे अवाहन सम्राट मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

या निवेदनावर मंडळाचे अध्यक्ष युवकनेते डाॅ. सिध्दार्थकूमार सूर्यवंशी,गफारखान पठाण,प्रशांत जाभाडे, अँड.सूभाषराव सोनकांबळे, मोहम्मद पठाण, फरदीन पठाण,विनोद नामपल्ले, शिरीष खंडाळीकर, कूदळकर बालाजी, कदम सूर्यकांत,आकाश सांगवीकर,भालेराव अजय,गणेश मदने,शहारूख पठाण,सचिन बानाटे,धम्मानंद कांबळे आदींचे नांवे आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here