अकोल्यात ३५ वर्षीय इसमाची दगडाने ठेचून हत्या !…

न्यूज डेस्क – अकोल्यात काल मध्यरात्रीच्या सुमारास ३५ वर्षीय इसमाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची घटना खदान पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नेहरू पार्क जवळ घटना घडली असून या हत्येने परिसरात खळबळ उडाली आहे. हत्येतील आरोपी अद्याप फरार असून खदान पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत

अकोला शहरात वाढीती गुन्हेगारी लक्षात घेता काल मध्यरात्रीच्या सुमारास अकोल्यातील नेहरू पार्क चौका जवळ दगडाने ठेचून एका इसमाचा हत्या करण्यात आली ३५ वर्षीय या इसमाचे नाव श्याम शंकर घोडे असून हा इसम खदान परिसरातील सरकारी गोडाऊन मागे राहत होता.

सदर इसम हा गवंडी काम करीत असल्याची माहिती प्राप्त होत आहे रात्रीच्या सुमारास आरोपीनी दगडाने ठेचून श्याम घोडे याची हत्या करून फरार झाले. घटनास्थळी दोन चिलम व रक्ताने माखलेले दगड मिळून आल्याने सदर हत्या ही व्यसनाच्या नशेत करण्यात आल्याचा प्रथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच खदान पोलीस घटनस्थिळी दाखल होऊन जागेचा पंचनामा करून मृदेह रात्रीच शवविच्छेदना साठी अकोलाजिल्ह्या सरोपचार रुग्णालयात पाठविण्यात आला. हत्या केल्या नंतर आरोपी घटनास्थळा वरून फरार झाले ही हत्या का झाली? नेमके कारण काय? किती आरोपी होते? याचा तपास खदान पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here